AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC ने 5 महिन्यात 31,398 खड्डे बुजवले, समस्या सोडवण्यासाठी 6 मीटर रुंदीच्या रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 9 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण 31 हजार 398 खड्डे बुजवले आहेत.

BMC ने 5 महिन्यात 31,398 खड्डे बुजवले, समस्या सोडवण्यासाठी 6 मीटर रुंदीच्या रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण होणार
bmc
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 7:55 PM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 9 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण 31 हजार 398 खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 1 लाख 56 हजार 910 चौरस मीटर इतके होते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते, ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह 6 मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. (BMC fills 31398 potholes in 5 months, 6 meter wide roads will be Cement concreted to solve the problem)

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे काम महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.

रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी 2 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित 50 लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.

याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला/अधिदान दिले जात नाहीत .

या अनुषंगाने यंदाचा विचार करता, महानगरपालिकेतर्फे दिनांक 9 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेच्या धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) मार्फत 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांना मिळून एकूण 2 हजार 696 मेट्रिक टन (1 लाख 07 हजार 843 बॅग) वितरित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध महानगरपालिकेच्या नियमित कामगारांमार्फत 22 हजार 897 खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. या बुजवलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ 49 हजार 919 चौरस मीटर आहे. तसेच, खड्डे बुजवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत 8 हजार 501 खड्डे बुजविण्यात आले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख 06 हजार 985 चौरस मीटर आहे.

डांबराचे रस्ते (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी, यापुढे 6 मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या कमी होणार आहे.

इतर बातम्या

कोणी म्हणालं कोरोनाचं संकट दूर कर, कोणी माझ्यावरचं विघ्न दूर कर म्हणालं, तर कोणी सरकारला सुबुद्धी दे म्हणालं; वाचा राजकारणी काय म्हणाले

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, काटेकोरपणे पंचनामे करा; वडेट्टीवारांच्या सूचना

आधी म्हणाले, मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही, आता म्हणतात, आले तर स्वागत करू; राणेंची तीन दिवसात पलटी

(BMC fills 31398 potholes in 5 months, 6 meter wide roads will be Cement concreted to solve the problem)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.