उल्हासनगरमधील उद्योजकाकडून थेट चंद्रावर जमीन खरेदी

उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

उल्हासनगरमधील उद्योजकाकडून थेट चंद्रावर जमीन खरेदी
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 12:17 AM

उल्हासनगर : चित्रपट क्षेत्रात वावरत असलेले व पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले उल्हासनगरमधील राम वाधवा (Ram Wadhwa) यांनी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली (Bought land on the moon) आहे. त्यांच्याअगोदर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेता शाहरुख खान तसेच आग्रा येथील एका व्यावसायिकाने चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारे राम वाधवा हे देशातील चौथे खरेदीदार ठरले आहेत. (Builder Ram Wadhwa from Ulhasnagar bought land on the Moon)

बांधकाम व्यावसायिक राम वाधवा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता त्यांनी भविष्याचा विचार करुन चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. वाधवा यांनी चंद्रावर 40 हजार 500 चौरस फूट (एक एकर) जमीन खरेदी केली आहे. चंद्रावरील जमिनीचे व्यवहार करण्यासाठी त्यांनी जयपूरमधील एका कंपनीला खरेदीचे काम दिले होते. अखेर वाधवा यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना जमिनीची कागदपत्रं मिळाली आहेत.

कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वाधवा यांना खरेदीची पावती मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी बीएसएल कंपनीकडे एक लाख 70 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना एक सॅटेलाइट फोन देण्यात आला आहे. हा फोनद्वारे समुद्र, जंगल एवढंच काय तर जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून संपर्क साधता येतो. यामधून आऊटगोईंग कॉल करण्यासाठी दर मिनिटाला 35 द्यावे लागणार आहेत, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण चंद्रावर जमीन खरेदी केल्याची माहिती वाधवा यांनी यावेळी दिली. परंतु ही जमीन किती रुपयांमध्ये खरेदी केली, याबाबतची माहिती देण्यास वाधवा यांनी नकार दिला.

इतर बातम्या

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव

आयकर विभागाकडून ई-मेल आला असेल तर दुर्लक्ष करू नका, होईल मोठं नुकसान

पगाराला हात न लावता गुंतवणुकीचा सोपा आणि भन्नाट मार्ग, जबरदस्त फायदा शक्य

(Builder Ram Wadhwa from Ulhasnagar bought land on the Moon)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.