Gautami Patil | गोंधळ नाही, कार्यक्रमही जल्लोषात तरी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजकांवर का झाला गुन्हा दाखल

Gautami Patil | अल्पवधीतच प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलचा कार्यक्रमात अनेक ठिकाणी गोंधळ होता. यामुळे पोलीस बंदोबस्त असतो. परंतु विरारमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. कार्यक्रमही जल्लोषात झाला. तरी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला.

Gautami Patil | गोंधळ नाही, कार्यक्रमही जल्लोषात तरी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजकांवर का झाला गुन्हा दाखल
gautami patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 8:45 AM

विरार : सबसे कातिल गौतमी पाटील… हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी आणि गर्दी हे जणू आता समीकरणच झालं आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होत नसेल. अगदी वाढदिवस की एखादा आनंदाचा कार्यक्रम फक्त काही निमित्त काढून गौतमीला बोलावलं जातं. गौतमीच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांवर दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहे. काही जण विरोध करत असले तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विरारमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणे आयोजकांना चांगलेच भोवले.

काय झाले विरारमध्ये

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला विरारमध्ये तुफान गर्दी झाली होती. विरारच्या खार्डी गावचे प्रभाकर पाटील यांनी आपल्या घराच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमी पाटील हिचा कार्यक्रम २५ मे रोजी ठेवला होता. हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात आणि शांततेत पार पडला. परंतु त्यानंतरी आयोजकावर गुन्हा दाखल झाला.

हे सुद्धा वाचा

का झाला गुन्हा दाखल

विरारमध्ये प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकास भोवलं आहे. परवानगीच्या अटी शर्थीचा भंग केल्याप्रकरणी भादवी कलम 188 अन्वेय आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाची परवानगी 10 वाजेपर्यंत असताना रात्री 11 च्या नंतर सुद्धा कार्यक्रम सुरूच ठेवल्याने मांडवी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे

आडनावाचा विषय टाळला

गौतमीच्या पाटील या आडनावाला मराठा महासंघाने विरोध केला आहे. त्यासंदर्भात तिचा विचारले असता त्यावर मला काही बोलायचे नाही. मी त्याकडे लक्ष देणे सोडून दिले आहेस असे म्हणून नो कॉमेंट्स म्हणत तिने बोलणे टाळले आहे.

सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. त्यावेळी तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही आणि थांबताना दिसत नाही.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.