आषाढी वारी वारकऱ्यांना टोलवसुलीपासून दिलासा मिळणार?, चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले नितीन गडकरी यांना पत्र

आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी आणि त्यांची वाहने जाणार असल्याने या विनंतीकडे नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

आषाढी वारी वारकऱ्यांना टोलवसुलीपासून दिलासा मिळणार?, चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले नितीन गडकरी यांना पत्र
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 4:31 AM

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी लाखो वारकरी येतात. वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूजल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाने लाखो भाविक, वारकरी आणि त्यांची वाहने जाणार असल्याने या विनंतीकडे नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पंढरपूरजवळील राष्ट्रीय महामार्ग ९६५ वरील पेनूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे टोल प्लाझा उभारण्यात आला आहे. त्यावर जून महिन्यापासून टोल वसुली प्रस्तावित आहे. ही टोल वसुली प्रक्रियाच पुढे ढकलण्याबाबत पत्र नितीन गडकरी यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

वारकरी आणि भाविकांना या राष्ट्रीय महामार्गाचा सुलभतेने वाहतुकीसाठी उपयोग करता येईल. भाविकांना या मार्गावरून प्रवास करताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. हा हे पत्र लिहिण्यामागचा उद्देश आहे.

यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

यात्रेसाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनासह विविध विभागांकडून जय्यत तयारी करण्यात येते. भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी नागरिक आणि संस्थादेखील मदतीला येतात. वारकरी आणि संबंधित संस्थांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे टोल संदर्भात विनंती केली.

त्याची दखल घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी यांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेत नितीन गडकरी काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितीन गडकरी यांच्या एका निर्णयाने लाखो भाविकांना दिलासा मिळू शकतो.

महाराष्ट्राची परंपरा आषाढ वारी

आषाढी यात्रा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ हा वारी मार्गावर आहे. या मार्गावरून लाखो वारकरी भाविक श्री विठ्ठल रुखमाई्च्या दर्शनासाठी वारी यात्रेच्या माध्यमातून प्रवास करतात. सुमारे सात लाख भाविक आणि त्यांची वाहने येथून जाणार आहेत. त्या सर्वांना दिलासा मिळावा यासाठी हे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.