“‘मविआ’ने काय केले नाही म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजीच शिक्षकांचे प्रश्न सोडवणार”; भाजप नेत्याकडून पदवीधर निवडणुकीवरून विरोधकांना डिवचले

महादेव कांबळे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 21, 2023 | 5:55 PM

राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे, आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

'मविआ'ने काय केले नाही म्हणून देवेंद्रजी आणि एकनाथजीच शिक्षकांचे प्रश्न सोडवणार; भाजप नेत्याकडून पदवीधर निवडणुकीवरून विरोधकांना डिवचले

मुंबईः सध्या राज्यात सर्वत्र पदवीधर मतदार संघावरून जोरदार राजकारण तापले आहे. प्रचाराला वेग आला असून महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून मविआवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआच्या काळात शिक्षकांच्या अनेक प्रश्न मांडले गेले.

मात्र त्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. ते मंत्रालयामध्ये किती काळ उपस्थित होते आणि त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले आले असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिक्षकांनी ऐन दिवाळीत आझाद मैदानावर आंदोलन केले. मात्र तरीही प्रश्न सुटले नाहीत. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा होऊन पहिल्या टप्प्यातील प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने सोडवले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे, आणि शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्न दोन्ही सरकारच्यावतीने सोडवले जातील असा विश्वास बावनकुळे यांनी दिला आहे.

त्याच बरोबर दोन्हीकडे हे सरकार असल्याने मराठवाड्यातील मतदारांनी विचार करून भाजपच्या पाठिंब्यावर उभा असलेल्या उमेदवाराला मतदान करावे असे आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून जैसे थे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना अठरा अठरा वर्षे न सुटलेले प्रश्न घेऊन शिक्षकांनी आंदोलन केले तरीही या महाविकास आघाडीने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र लक्ष घालून त्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रश्न सोडवण्याचा मार्ग खुला केला असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI