मुंबई : माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीनअप मार्शल यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या भागात एक मार्शल नियमामुसार आखून दिलेल्या दंडापेक्षा नागरिकांकडे जास्त पैशांची मागणी करत होता. याच कारणामुळे नागरिक आणि क्लिनअप मार्शल यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर भांडणात झाल्यामुळे मार्शलने नागरिकांवर दगडफेकदेखील केली. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.