आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, रात्री उशिरा मुंबईत मोठ्या हालचाली, ‘वर्षा’वर काय घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, रात्री उशिरा मुंबईत मोठ्या हालचाली, 'वर्षा'वर काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 11:52 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडत आहे. विशेष म्हणजे काल रात्री उशिरा देखील या तीन नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज पुन्हा रात्री उशिरा या तीन नेत्यांमध्ये बैठक सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील कालच्या बैठकीनंतर आज राष्ट्रवादीच्या आठ नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयातील कोणतं दालन कुणाला द्यावं, याबाबत राज्य सरकारकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं मिळत आहेत. त्यासाठीच या तीनही बड्या नेत्यांची बैठक पार पडत असल्याची मिळत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी तर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला सांगून टाकला आहे. भरत गोगावले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना भाजप आणि शिवसेनेत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. तसेच याच फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सात नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याआधीच खात्रीलायक सूत्रांनी या विस्तारातील तीन मंत्र्यांची नावे सांगितली आहे. यामध्ये भारत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव समोर आलं आहे. तसेच चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते ते लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याशिवाय या विस्तारात राष्ट्रवादीला स्थान नसणारची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ही बैठक सुरु असताना शिंदे गटाचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी ‘वर्षा’ बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.  “वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री विस्ताराबद्दल लवकरच निर्णय घेतील. मी आतमध्ये होतो. माझ्या विभागाचे काही काम होतं, त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. सध्या चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र राज्याच्या विकास होत आहे म्हणून अजित पवार सोबत आलेले आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.