‘लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस सदस्य व्हा’, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटलांचं आवाहन

काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील म्हणाले.

'लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस सदस्य व्हा', काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटलांचं आवाहन
काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 1:53 PM

मुंबई : ‘काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई व महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिराजी, राजीवजी यांना ताकद दिली आहे. काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे पाटील यांच्या हस्ते सोमवारी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. (H.K. Patil and Nana Patole criticize central government and BJP)

मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सोमवारी सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली येथे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात, कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या हस्ते तर अमरावती येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला.

मुंबई काँग्रेस 10 लाख सदस्यांची नोंदणी करणार

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर 1 नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस 10 लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुलजी गांधी 28 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.

‘देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही’

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, देशाचे संविधान आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्या पासून संविधान आणि पर्यायाने देशाला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत लोकांना काँग्रेससोबत जोडले पाहिजे.

चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचे सरकार आले तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहील त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम, संदीप, सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, खजिनदार डॉ. अमरजीत सिंह मनहास, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे , मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई, मोहन जोशी, कमांडर कलावत, देविदास भन्साळी, भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रमोद मोरे, राजेश शर्मा, राजन भोसले, रामचंद्र आबा दळवी, मनोज शिंदे, जोजो थॅामस, ब्रिजकिशोर दत्त, भावना जैन, व्हीजेएनटी विभागाचे अध्यक्ष मनोज जाधव, माजी आ. सुभाष चव्हाण, हुस्नबानो खलिफे, प्रवक्ते अरुण सावंत, सचिव झिशान अहमद, आनंद सिंग, विश्वजीत हाप्पे, आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय- पटोले

गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून काँग्रेसला नेहमी त्यांनी साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी करणे गरजेचे आहे. गावा गावात जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय आहेत. भाजपचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्यनोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

इतर बातम्या :

‘अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, अजित पवारांनी चौकशीला सामोरं जावं’, रामदास आठवलेंचा सल्ला

ठाकरे सरकारच्या मदतीनं परमबीर सिंग गायब, आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप

H.K. Patil and Nana Patole criticize central government and BJP

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.