AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केईएम रुग्णालयातील कोव्हिशील्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण, 95 जणांना लसीकरण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध रुग्णालयात कोरोना प्रतिबंधित लसीची चाचणी केली जात आहे. (Corona Covishield Vaccine Second phase completed at KEM Hospital)

केईएम रुग्णालयातील कोव्हिशील्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण, 95 जणांना लसीकरण
| Updated on: Dec 01, 2020 | 11:36 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध रुग्णालयात कोरोना प्रतिबंधित लसीची चाचणी केली जात आहे. नुकतंच कोरोना विषाणूवरील कोव्हिशिल्ड लसीच्या केईएम रुग्णालयातील दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात एकूण  95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यानंतर आता 21 मार्चपर्यंत या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले जाणार आहे. (Corona Covishield Vaccine Second phase completed at KEM Hospital)

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा टप्प्यासाठी 101 जणांना डोस देण्यात आला होता. मात्र दुसऱ्या फेरीत 6 स्वयंसेवक सहभागी झाले नाही. त्यामुळे फक्त 95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीतील डोस पूर्ण झाले आहेत.

आता येत्या  21 मार्चपर्यंत या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले जाणार आहे. जर या स्वंयसेवकावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले तर त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल.

दरम्यान, नायर रुग्णालयात आता फक्त 16 स्वयंसेवकांना लसीचा डोस देणे बाकी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात नायरमध्येही या लसीचा टप्पा पूर्ण होईल. नायरमध्ये पहिला डोस 145 जणांना दिला गेला. आतापर्यंत दुसरा डोस 129 जणांना दिला आहे. तर 16 जणांना देणे बाकी आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 145 स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जाण्याची शक्यता आहे. (Corona Covishield Vaccine Second phase completed at KEM Hospital)

संबंधित बातम्या : 

पालघरमध्ये कामगारांचा कोका-कोला कंपनीविरुद्ध एल्गार, उपासमारीची वेळ आल्याने 131 जणांचं कुटुंबासह धरणे आंदोलन

बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.