Corona | APMC मध्ये भाजी-पाल्याची आवक, मात्र उठावच नाही, कोबी 2 रु., तर टोमॅटो 8 रु, किलो

भाजीपाला बाजारात शेतमालाच्या 900 गाड्या आल्या असून कोबी, फ्लावर या भाज्या 2 ते 5 रुपये किलो विकली जात आहेत

Corona | APMC मध्ये भाजी-पाल्याची आवक, मात्र उठावच नाही, कोबी 2 रु., तर टोमॅटो 8 रु, किलो
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 12:26 PM

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव (Corona Effect On Vegetable Market) रोखण्यासाठी देशातील किरकोळ बाजार, मॉल्स, फेरीवाले, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश संबंधित ठिकाणच्या प्रशासनाकडून दिले जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात विक्रमी आवक झाल्याने भाज्यांचे (Corona Effect On Vegetable Market) भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

आज भाजीपाला बाजारात शेतमालाच्या 900 गाड्या आल्या असून कोबी, फ्लावर या भाज्या 2 ते 5 रुपये किलो विकली जात आहेत. ग्राहक नसल्याने गाड्यावर आणि दुकानात भाजीपाला ठेवण्यात आला आहे. भरमसाठ उत्पादनामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्यातही ‘मंदी’चा कोरोना आल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा : Mumbai local | गर्दी हटेना, मोठे पाऊल उचलावे लागेल, मुंबई लोकलबाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे संकेत

राज्यातील विविध ठिकाणी भाजीपाल्याचे (Corona Effect On Vegetable Market) पीक घेण्यात येते. अल्पभूधारक शेतकरी मेहनत करुन टोमॅटो, मिरची, कोबी, पालक, कोथिंबीर, मेथी, बरबटी आदींचे भरघोस उत्पादन घेतात. भाजीपाला पिकावर त्यांचा चरितार्थ चालतो.

बाजारामध्ये भाजीपाल्याची वाढलेली आवक आणि कमी झालेल्या उठावामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. बाजार आवारात कोबीचे ढीग खरेदीविना पडून आहेत. तीच परिस्थिती टोमॅटो, फ्लावर, वाटाणा, भेंडी, वांगींची आहे. काही शेतकऱ्यांनी बाजार आवारात कोबी विक्रीसाठी आणली. मात्र, त्यांच्या कोबीला केवळ प्रतिकिलो दोन रुपयेच भाव मिळाला. त्यामुळे खर्चवजा जाता त्याला चार हजार रुपये तोटा सोसावा लागला. लागवडीचा खर्च तर सोडाच विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघाला नाही.

एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचे भाव

  • कोबी – 2 रुपये किलो
  • फ्लावर – 5 रुपये किलो
  • वाटाणा – 20 रुपये किलो
  • भेंडी – 20 रुपये
  • टॉमेटो – 8 रुपये किलो
  • वांगी – 10 रुपये किलो

कोरोनाचा हाहा:कार, देशात चौथा बळी

देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 52 वर येऊन पोहोचली आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 9
  • मुंबई – 10
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 2
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1
  • एकूण 51

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (1) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • एकूण – 51 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Effect On Vegetable Market

संबंधित बातम्या 

Corona | सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी

Corona positive | मुंबईतील 2 महिला, नगरमधील एकाला लागण

CM LIVE : घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका : मुख्यमंत्री

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.