Corona Update : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील!

Corona Update : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील!
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 शहरांपैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील आहे. तर अन्य 3 शहरे ही अनुक्रमे कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्ली आहेत.

सागर जोशी

|

Apr 06, 2021 | 4:46 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. अशावेळी राज्याची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आलीय. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 शहरांपैकी 7 शहरं एकट्या महाराष्ट्रातील आहे. तर अन्य 3 शहरे ही अनुक्रमे कर्नाटक, छत्तीसगड आणि दिल्ली आहेत. (Pune, Mumbai, Thane, Nagpur, Nashik, Aurangabad, Ahmednagar are top corona affected cities in the country)

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती? (शहरे आणि अॅक्टिव्ह रुग्णसंख्या)

पुणे – 81 हजार 378 मुंबई – 73 हजार 281 ठाणे – 57 हजार 635 नागपूर – 55 हजार 926 नाशिक – 34 हजार ५४० औरंगाबाद – 16 हजार 818 अहमदनगर – 17 हजार 716

तर पहिल्या 10 शहरांमध्ये बंगळुरु शहर (30 हजार 782), दिल्ली (14 हजार 579) तर दुर्ग (12 हजार 589) या शहरांचाही समावेश आहे.

काल दिवसभरात 47 हजार 288 नवे कोरोना रुग्ण

राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 टक्के झालं आहे. राज्यात काल मृत्यूच्या संख्येतही काही दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोमवारी हिच संख्या 222 वर होती. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 24 लाख 16 हजार 981 व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. तर 20 हजार 115 वक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यातील कठोर निर्बंधांबाबत ठाकरे बंधुंमध्ये चर्चा, अमित ठाकरेंचीही हजेरी

Corona Update : 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती

“फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर”

Pune, Mumbai, Thane, Nagpur, Nashik, Aurangabad, Ahmednagar are top corona affected cities in the country

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें