लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली

कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. (Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने मुलुंड परिसरात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:02 AM

मुंबई: कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील एका नर्सला कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. ही घटना ताजी असतानाच आता घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. (Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

पुणे, नाशिकमध्ये लस टोचल्यानंतरही कोरोना

या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. नर्सला कोरोनाची लस टोचल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं ससूनचे डीन मुरलीधर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील 12 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे, असं निकम म्हणाले.

कोरोनातून बरे झाल्यावरही कोरोना

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते. तसेच नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.

चेंबूरमध्ये चार इमारती सील

मुंबईत काल 823 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर येथे कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. चेंबूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे. (Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

संबंधित बातम्या:

यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

पुण्यात मास्क न घातल्यास 1 हजार रुपयांचा दंड, कोरोनाची नवी नियमावली जाहीर

(Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.