AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला? मुलाला तिकीट मिळणार?

Arjun Khotkar Meet Sunetra Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून तणाव असतानाच मुंबईत मोठ्या घाडमोडी घडत आहेत. मराठवाड्यातील शिंदे सेनेचे शिलेदार अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आज महायुतीची बैठक बोलावली आहे.

महायुतीत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला? मुलाला तिकीट मिळणार?
सुनेत्रा पवार, अर्जुनराव खोतकरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 26, 2026 | 9:51 AM
Share

Arjun Khotkar Meet Sunetra Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. जळगाव जागेनंतर इतर ठिकाणही अशीच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मुलगा अभिमन्यू खोतकर याला तिकीट मिळण्यासाठी ते आग्रही आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने महायुतीची बैठक बोलावली आहे. मुंबईत आज दिवसभर जोरदार राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुतीची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत हे या बैठकीला उपस्थित असतील. पुण्यावरून भाजप-राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रफती संभाजीनगर वरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. आजच्या बठकीत महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

खोतकर हे मुलासाठी आग्रही

शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर आज सकाळी भेट घेतली. खोतकर हे मुलगी दर्शना खोतकर-झोलसाठी आग्रही असल्याचे बोलले जात होते. पण खोतकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर मुलगी नाही तर मुलगा अभिमन्यू खोतकर विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती दिली. अभिमन्यू याला तिकीट देण्याचा प्रश्न हा पक्षाचा आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील असे खोतकर म्हणाले. अभिमन्यू खोतकर याला तिकीट मिळावे अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे मुलाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची कुठलीही मागणी केली नाही. मी कामासाठी त्यांना भेटल्याची माहिती खोतकर यांनी दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नंतर मराठवाड्यातील अजून एका जागेसाठी शिंदे सेना आग्रही असल्याचे दिसते. आजच्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा