Dr Ambedkar’s residence Rajgruha vandalised | ‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलैला तोडफोड करण्यात आली (Rajgruha vandalised accused arrested) होती.

Dr Ambedkar’s residence Rajgruha vandalised | 'राजगृह'वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
Namrata Patil

|

Jul 22, 2020 | 11:50 PM

मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलैला दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे. (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised accused arrested)

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर 7 जुलैला तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करुन एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीचे नाव उमेश सीताराम जाधव असं आहे. उमेश हा हल्लेखोरांच्या सोबत होता. उमेशकडून माहिती घेऊन पोलीस प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेत होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

यानंतर आज (22 जुलै) मुख्य आरोपी असलेल्या विशाल मोरेला अटक करण्यात आली. विशाल अशोक मोरे उर्फ विठ्ठल काण्या असे या आरोपीचे नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे. विठ्ठल काण्या हा मजूर आहे. तो कल्याण स्टेशन येथे राहतो.

नेमकं काय घडलं? 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी मंगळवारी (7 जुलै) संध्याकाळच्या सुमारास तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी तोडफोड केली. संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास एक निळ्या रंगाचे शर्ट घातलेला तरुण घटनास्थळी आला. त्या तरुणाने राजगृहाच्या गेटसमोर येत दगडफेक केली. जवळपास आठ-नऊ दगड त्याने राजगृहाच्या दिशेने भिरकावले. यानंतर हा तरुण गेट उघडून आत शिरला. त्याने कुंड्यांचे नुकसान केले, हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. (Dr Babasaheb Ambedkar Mumbai Residence Rajgruha vandalised accused arrested)

संबंधित बातम्या : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

Dr Ambedkar’s residence Rajgruha CCTV | ‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें