BMC Election Results 2026 LIVE : बोरिवली वॉर्ड क्रमांक 7 ते 13 चा निकाल जाणून घ्या

BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 7 ते 13 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

BMC Election Results 2026 LIVE : बोरिवली वॉर्ड क्रमांक 7 ते 13 चा निकाल जाणून घ्या
BMC Election 2026
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 1:31 AM

वॉर्ड क्रमांक 7 मधून मागच्यावेळी शिवसेनेच्या तिकीटावर शितल म्हात्रे निवडून आल्या होत्या. मागच्यावेळी चुरशीची निवडणूक झालेली. त्यांनी 580 पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळवलेला. शितल म्हात्रेंना 8205 मतं मिळाली, तर भाजपच्या योगिता पाटील यांना 7625 मतं मिळाली.  दुसऱ्या पॅराग्राफखाली 2026 पालिका निवडणुकीतील तुमच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार पाहा

2017 विजयी उमेदवार – शिवसेना शितल म्हात्रे

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

यंदाची महापालिका (BMC) निवडणूक वॉर्ड क्रमांक 8 अत्यंत चुरशीची आणि रोचक होईल अशी अपेक्षा आहे. मागच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे प्रत्येक पक्षाला कळून चुकलं. गेल्यावेळी बहुरंगी निवडणूक होती. यावेळी थेट दुरंगी किंवा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

BMC Election Result 2026 : वॉर्ड क्रमांक 7 ते 13 निकाल 

  

वॉर्ड क्रमांक 9 मधून मागच्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर श्वेता शरद कोरगावकर निवडून आलेल्या. त्यांनी 2000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवलेला. श्वेता शरद कोरगावर यांना 9654 मतं मिळालेली, तर भाजपच्या मोहन मिठबावकर यांना 7685 मतं मिळाली.

2017 विजयी उमेदवार – काँग्रेस श्वेता शरद कोरगावकर

वॉर्ड क्रमांक 10 मधून मागच्यावेळी भाजपच्या तिकीटावर जितेंद्र अंबालाल पटेल निवडून आलेले. त्यांनी 6000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवलेला. जितेंद्र अंबालाल पटेल यांना 15585 मतं मिळालेली, तर शिवसेनेच्या मिलिंद म्हात्रे यांना 9362 मतं मिळाली.

2017 विजयी उमेदवार – भाजप जितेंद्र अंबालाल पटेल

महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 11चं गणितही तसंच आहे. मागील वेळी म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेनं हा वॉर्ड जिंकला. शिवसेनेच्या उमेदवार रिद्धी भास्कर खुरसंगे (Riddhi khursunge) यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. खुल्या प्रवर्गातून त्यांनी उमेदवारी लढवली होती.

2017 विजयी उमेदवार – शिवसेना रिद्धी भास्कर खुरसंगे

मागील वेळी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 (ward Number 12) मध्ये शिवसेनेची सत्ता होती. बोरीवली नॅशनल पार्कसारख्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मतरदारसंघावर शिवसेनेच्या गीता संजय सिंघन यांचा मागील निवडणुकीत विजय झाला होता.

2017 विजयी उमेदवार – शिवसेना संजय सिंघन

वॉर्ड क्रमांक 13 मधून मागच्यावेळी भाजपच्या तिकीटावर विद्यार्थी सिंह निवडून आलेले. त्यांनी 7000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवलेला. विद्यार्थी सिंहयांना 13113 मतं मिळालेली, तर शिवसेनेच्या राजेश कदम यांना 5907 मतं मिळाली.

2017 विजयी उमेदवार – विद्यार्थी सिंह

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE