AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा

तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे (Examination date of Mumbai University declared after cyber attack issue).

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
| Updated on: Oct 07, 2020 | 10:13 PM
Share

मुंबई : तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे (Examination date of Mumbai University declared after cyber attack issue). परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रद्द झालेल्या आणि पुढील सर्व परीक्षा 19 ॲाक्टोबर 2020 पासून सूरु होणार आहेत. याबाबत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची आज (7 ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत परीक्षेच्या तारखेवर निर्णय घेण्यात आला. विनोद पाटील म्हणाले, “सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही. तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करु नये.”

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ प्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या दिवशी 9 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा होती. मात्र, ऐनवेली परीक्षेच्या दिवशी जवळपास अडीज ते 3 लाख लोकांनी हे अ‍ॅप ओपन केल्याचा प्रकार समोर येतोय. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यापीठाच्या तांत्रिक टीमसोबत बैठक घेतली. यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.

उदय सामंत म्हणाले, “परीक्षेची पूर्ण सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा सायबर हल्ला असल्याने या संदर्भात कुलगुरुंनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान केलं जाणार नाही. या साऱ्या प्रकरणात चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. मुंबईचे कायदा आणि सुववस्थेचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि कुरुगुरु यांची याच संदर्भात बैठक झाली.”

“9 हजार मुलांच्या परिक्षेचे नियोजन मुंबई विद्यापिठाने चांगल्या प्रकारे केलं होतं. विद्यापीठाने आणखी चांगली यंत्रणा उभी करुन परीक्षा घ्यावी, अशा सुचना कुलगुरुंना दिल्या आहेत,” अशी माहितीही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन परीक्षेचा गोंधळ, धक्कादायक माहिती समोर, नांगरे-पाटलांकडे तपास

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत ‘अनलॉक की’ने गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना मनःस्ताप

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Examination date of Mumbai University declared after cyber attack issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.