Ganpati Visarjan 2024 LIVE : दिग्गज मंत्री आणि आमदारांना थेट साडी चोळीचा आहेर
गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
Ganpati Visarjan 2024 LIVE : एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या मुंबईचा राजा गणेशगल्ली, लालबागचा राजा, तेजूकाय, काळाचौकीचा महागणपती, चिंतामणी यांसह ठिकठिकाणी बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना लवकरच सुरुवात होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
रायगडमध्ये भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
रायगडच्या पाली-खोपोली मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एका स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कानसळ गावाजवळ संबंधित अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर मृतांना जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.
-
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्याविरुद्ध याचिका
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
-
सीएम योगींचा काँग्रेसवर हल्लाबोल
सीएम योगी यूपीच्या गाझियाबादमध्ये आहेत. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या उभारणीत काँग्रेस सर्वात मोठा अडथळा होती.
-
हरियाणा निवडणूक: काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
हरियाणासाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. पक्षाने महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासनही दिले आहे.
-
सिंधू जल कराराचे पुनरावलोकन करण्यासाठी भारताने पाठवली पाकिस्तानला नोटीस
सिंधू जल कराराचे पुनरावलोकन करण्यासाठी भारताने पाकिस्तानला औपचारिक नोटीस पाठवली आहे. असा युक्तिवाद करण्यात आला आहे की परिस्थितीतील मूलभूत आणि अनपेक्षित बदलांमुळे, कराराचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे.
-
-
वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव आज कॅबिनेटने स्वीकारला – अश्विनी वैष्णव
वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव आज कॅबिनेटने स्वीकारला आहे. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने हा रिपोर्ट तयार केला होता. निवडणुकीसाठी होणारा खर्च, पोलीस फोर्स, वेळ हे सगळं टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. विकास मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमुळे अडथळा येतो, तो होऊ नये यासाठी हा निर्णय २ टप्यात लागू होईल. एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर १०० दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील. अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
-
पुण्यातील मिरवणूक २८ तासानंतर संपल्या, पुणे पोलिसांकडून जाहीर
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली की, पुण्यातील मिरवणूका 3 वाजता संपल्या आहेत. 28 तास मिरवणुका सुरू होत्याय शांततेत गणेशोत्सव पार पडला. त्याबद्दल सर्व मंडळ आणि भक्तांचे धन्यवाद. यासाठी 8 हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. लेजर वर पूर्ण पणे बंदी होती. ज्या ठिकाणी लेजर लाईट सुरू होती त्या ठिकाणी कारवाई करणार आहे.
-
दिग्गज मंत्री आणि आमदारांना थेट साडी चोळीचा आहेर
नारपार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी काम न केल्याने खान्देश हित संग्राम संघटनेने कल्याणमधून कुरियरद्वारे उत्तर महाराष्ट्रातील २५ आमदार आणि मंत्र्यांना साडी चोळीचा आहेर पाठवला आहे.
-
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांचे मोठे आवाहन
भिवंडी शहरात ईद ए मिलादुन्नबी मिरवणुकीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात; अफवांवर विश्वास ठेवू नका – वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांचे आवाहन
-
निफाड येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू दाखल होताच जंगी स्वागत
दीडशे किलोचा हार क्रेनच्या साह्याने घालून शांतीनगर चौफुलीवर बच्चू कडू चे कार्यकर्त्यांकडून स्वागत….
-
नाशिकमध्ये उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन
पोलिसांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या विरोधात आंदोलन. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलं आंदोलन
-
मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली- यशोमती ठाकूर
मागच्या वेळी अमरावतीत दंगल केली म्हणून अनिल बोंडे यांना खासदारकी मिळाली-काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप. गेल्या दीड तासापासून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे सह काँग्रेस कार्यकर्त्यांच पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात आंदोलन सुरू.
-
पीएम मोदी किती तारखेला अमेरिका दौऱ्यावर जाणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 सप्टेंबर रोजी अमेरिका दौऱ्यावर. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार. मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर. संयुक्त राष्ट्रांच्या ‘समिट ऑफ द फ्युचर’ मध्येही मोदी सहभागी होतील. मोदी २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती.
-
सीमेजवळ चीनने बांधला हेली पोर्ट
चीनने अरुणाचल बॉर्डर वर फिश टेलस सेक्टर जवळ LAC पासून 20 किमी अंतरावर हेली पोर्ट तयार केलंय, ज्याची लांबी 600 मी आहे. ज्यामुळे चिनी सैन्याला सीमेजवळ येण्या-जाण्यास मोठी मदत होणार आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून चीनचा कारनामा समोर. हेलीपोर्टवर छोटी विमान आणि हेलिकॉप्टर यांचे टेकऑफ लँडिंग सहजतेने शक्य होऊ शकतं.
-
24 तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास झाले आहेत. अजून ही मिरवणुका चालूच आहेत. आता पर्यंत 116 गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे. काल 10 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड , केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरूच आहे. आता या मिरवणुकीला 24 तास उलटले आहेत.
-
लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
अनेक तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. यावेळी चौपाटीचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला होता.
-
Maharashtra News: कुणाल पाटील यांचे धुळे शहरात लागले भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर..
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे धुळे शहरात लागले भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर.. आज कुणाल पाटील यांचा वाढदिवस उत्साही कार्यकर्त्यांकडून थेट भावी कॅबिनेट मंत्री बॅनरवर उल्लेख…
-
Maharashtra News: पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला 23 तास पूर्ण
पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला 23 तास पूर्ण… मानाचे पाच गणपती सह प्रमुख गणपतींची विसर्जन मिरवणूक संपन्न.. मात्र अजूनही विसर्जन मिरवणूक सोहळा सुरूच… अलका टॉकीज चौकात तिन्ही रस्त्यांवरून येत आहेत गणेश मंडळे… कुमठेकर, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरून येत आहेत मिरवणुका… पोलिसांकडून गणेश मंडळांना मिरवणूक पुढे नेण्याचे करत आहेत आवाहन
-
Maharashtra News: बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू
बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू… खाली डोकं वर पाय करत सुरू केले अनोखे उपोषण… आनंद काशीद या जरांगे समर्थकाने सुरू केले हे अनोखे आंदोलन… अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आले उपोषण… बार्शीतील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरू केलं उपोषण…
-
Maharashtra News: हिंगोली-जिल्ह्यातील तीन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा
हिंगोली-जिल्ह्यातील तीन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा.. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला अशा शेतकऱ्यांना 25% अग्रीम मिळणार पिक विमा… कृषीधिक्षक राजेंद्र कदम यांची माहिती..
-
बाप्पाला जाऊ देऊ नका, निरोपावेळी चिमुरड्याला अश्रू अनावर
गणपती विसर्जावेळी ‘बाप्पाला जाऊ देऊ नका’ म्हणत 4 वर्षांच्या चिमुरड्याला अश्रू झाले अनावर. ओक्साबोक्शी रडणाऱ्या मुलाचा व्हिडीओ झाला व्हायरल. ‘ बाप्पाला जाऊ देऊ नका, मला बाप्पा हवाय’ असं म्हणत साश्रू नयनांनी दिला बाप्पाला निरोप
-
जळगाव – विसर्जन मिरवणुकीदरम्यान जामोद शहरात दगडफेक
जळगाव जिल्ह्यातील जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र आरोपींना अटक होईपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका 18 गणेश मंडळांनी घेतली आहे.
-
लालबागच्या राजाची निरोपाची आरती संपन्न, थोड्याच वेळात विसर्जन
लालबागचा राजा चौपाटीवर दाखल झाला असून गणरायाची निरोपाची आरती संपन्न झाली आहे. भाविकांची मोठी गर्दी झाली असून प्रख्यात उद्योगपती अनंत अंबानी देखील येथे उपस्थित आहेत. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे विसर्जन होईल.
-
गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुण गणेशभक्तावर काळाचा घाला
गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुण गणेशभक्तांवर काळाचा घाला. गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरुण गणेश भक्त नदीच्या पाण्यात वाहून गेले. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यातील 2 युवक तर दर्यापूर तालुक्यातील 1 युवक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नदीत वाहून गेलेल्या गणेश भक्तांचा सध्या शोध सुरू..
-
गिरगाव चौपाटी येथे लालबागचा राजा दाखल , थोड्याच वेळात होणार विसर्जन
कालपासून सुरू झालेल्या विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आता गिरगाव चौपाटी परिसरात येण्यास सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाचे देखील या ठिकाणी आगमन झाले असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लालबागच्या राजासोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
-
साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन
सातारा शहरातील राजपथावर 180 हून अधिक गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रशासनाने लेझर लाईटवर बंदी आणि म्युझिक सिस्टम डेसिमल मर्यादा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लावण्याचे आवाहन केले होते. मात्र या नियमांचे सातारा शहरात पूर्णपणे उल्लंघन झालेले पाहायला मिळाले. काही मंडळांनी पारंपारिक ढोल वाद्य वाजवत या मिरवणुका काढल्या तर काही मंडळांनी डीजे म्युझिक लेदर शो चा वापर करत डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला.
-
मानाच्या पाच गणपतीसह अलका चौकातून 87 मंडळे विसर्जनासाठी रवाना
पुण्यातील मानाच्या पाच गणपतीसह अलका चौकातून 87 मंडळे विसर्जनासाठी रवाना झाले आहे. पुण्यात 21 तासांहून अधिक वेळ मिरवणूक सुरू आहे. गेल्या वर्षी दुपारी 3 वाजायच्या आसपास मिरवणूक संपली होती.
-
नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट
नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागले आहे. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना घडली आहे.
-
भाऊ रंगारी गणपती अलका चौकात दाखल
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक लांबणार आहे. भाऊ रंगारी गणपती आता अलका चौकात दाखल झाला आहे. पोलीस प्रशासनाकडून मिरवणूक लवकर पूर्ण होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला जात आहे.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटी परिसरात दाखल
चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटी परिसरात दाखल झाला आहे. लालबागचा राजानंतर गिरगाव चौपाटी परिसरात चिंतामणी दाखल झाला आहे. चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.
-
पुण्यात १९ तासापासून विसर्जन मिरवणूक सुरूच
पुण्यात १९ तासापासून विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. अलका चौकात भाऊ रंगारी आणि अखिल मंडई गणपती अद्याप आले नाही. पुण्यातली मिरवणूक दुपारीच संपण्याची शक्यता आहे.
-
लालबागच्या राजासोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा
गिरगाव चौपाटी येथे लालबागचा राजा दाखल झाला आहे. लालबागच्या राजासोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे. आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे.
-
हरमनप्रीत सिंगची एफआयएच प्लेयर ऑफ द इयरसाठी नामांकन
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (FIH) वर्षातील सर्वोत्तम खेळाडूसाठी, तर अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशची वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठी नामांकन करण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू गेल्या महिन्यात पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते.
-
परवानगीशिवाय बुलडोझरची कारवाई नाही : SC
सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत परवानगीशिवाय खासगी मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यास बंदी घातली आहे. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच 1 ऑक्टोबरपर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. बुलडोझरच्या कारवाईबाबत न्यायालयाने राज्यांना कडक निर्देश दिले आहेत. मात्र, सार्वजनिक अतिक्रमणे काढता येतील.
-
ईडीच्या अटकेविरोधात आपचे आमदार अमानतुल्ला यांनी उच्च न्यायालयात धाव
आम आदमी पक्षाचे दिल्लीतील ओखला मतदारसंघातील आमदार अमानतुल्ला खान यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अटकेला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एजन्सीने केलेल्या नियुक्तींमधील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
-
मनोज वर्मा कोलकाताचे नवे पोलीस आयुक्त
मनोज कुमार वर्मा हे कोलकाताचे नवे पोलीस आयुक्त असतील.
-
पुण्यात मानाचे पाचही गणपती विसर्जन मार्गावर
मानाचे पाचही गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडवर विसर्जन मार्गाला लागले आहेत. दगडूशेठ गणपतीची आरती सुरू झाली. आता थोड्याच वेळात दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होणार आहे.
-
नाशिकमध्ये मानाच्या गणपतीची पूजा करुन मिरवणुकीला सुरुवात
जुन्या नाशिक भागात वाकडी बारव येथे दादा भुसे यांच्या उपस्थितीत मानाच्या पहिल्या गणपतीचे पूजन करण्यात आले आणि विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात आणि चित्ररथासह ही मिरवणूक निघाली आहे.
-
विसर्जन मिरवणुकीत तीन बालकं टॅक्टर खाली
धुळे शहरा लगत असलेल्या चितोड गावात गणपती मिरवणुकीच्या ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चितोड गावातील एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीचा ट्रॅक्टर भाविकांच्या अंगावर गेला. ट्रॅक्टर चालक दारू पिला असल्याची माहिती समोर येत आहे. तीन लहान बालके ट्रॅक्टर खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
-
गिरगाव चौपटीवर मोठे गणपती येण्यास झाली सुरुवात
गिरगाव चौपाटीवर मोठे गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतींसमवेत इथं सार्वजनिक गणेशमूर्तीं पण विसर्जनासाठी दाखल होत आहेत. चौपटीवर एकच गर्दी झाली आहे.
-
समुद्राला येणार रात्री भरती, विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अलर्ट
गणपत्ती बाप्पाचे समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी महत्वाचा अलर्ट आहे. आज रात्री 11 वाजता समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविक भक्तांनी समुद्र किनारी जाणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे भरतीपूर्वीच गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन करण्याची शक्यता आहे.
-
मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डींग येथे पुष्पवृष्टी
चिंच पोकळीतील श्रॉफ बिल्डींग या परिसरात गणेशगल्लीचा गणपती अर्थात मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘ही शान कोणाची, मुंबईच्या राजाची…’ असा एकच जयघोष भाविक भक्तांनी यावेळी केली.
-
सार्वजनिक गणेश मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
जळगावात सार्वजनिक गणेश मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मानाच्या गणपतीचे जिल्हाधिकारी तसेच आमदारांच्या हस्ते आरती करण्यात आली. विसर्जन मिरवणुकीमध्ये आमदार जिल्हाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नृत्य करत आनंद साजरा केला. विसर्जन मिरवणुकीमध्ये महापालिकेच्या मानाचा गणपती सर्वात पुढे असून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सुमारे ७५ सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी झाले आहेत.
-
सुप्रीम कोर्टाची बुलडोजर कारवाईवर स्थगिती
अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी वेगळा पर्याय हवा. जमीयत उलेमा हिंद याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी. १ ऑक्टोबर पर्यंत बुलडोझरने तोडफोड करण्यास कोर्टाची मनाई
-
बेलबाग चौकामध्ये मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची मिरवणूक दाखल
गजलक्ष्मी ढोल पथकाकडून ढोल वादन सुरू. बेलबाग चौकात ढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरयाचा गजर
-
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचे नातू शिखर पहारिया याच्या हस्ते बाप्पाचे विसर्जन
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेच्या यांच्या घरातील बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन
-
जळगावात सार्वजनिक गणेश मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरुवात
महापालिकेच्या मानाच्या गणपतीचे जिल्हाधिकारी तसेच आमदारांच्या हस्ते आरती करण्यात येऊन मिरवणुकीला झाली सुरुवात..विसर्जन मिरवणुकीमध्ये आमदार जिल्हाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नृत्य करत आनंद साजरा केला.
-
धुळे शहरात वाजत गाजत गणपती विसर्जनाला सुरुवात
धुळे शहरात वाजत गाजत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतीसह मंडळांच्या गणपती मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी पांझरा नदी किनारी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम ड्रम ठेवण्यात आले आहेत. अनेक भाविकांनी हौदात गणेश मूर्तीचं विसर्जन केलंय.
-
‘लालबागचा राजा’ गणपती बाप्पाची मूर्ती मंडपाबाहेर
‘लालबागचा राजा’ गणपती बाप्पाची मूर्ती मंडपाबाहेर आली असून गणरायाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, गुलाल उधळण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची तुफान गर्दी पहायला मिळतेय.
-
नाशिक- विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
नाशिक- विसर्जन मिरवणुकीत लेझरचा वापर केल्यास थेट गुन्हे दाखल होणार आहेत. नाशिक पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांना तंबी दिली आहे. मंडळांनी लेझरचा वापर करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
-
‘बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर’; लालबागचा राजाच्या चरणी ठेवली चिठ्ठी
बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर.., अशी चिठ्ठी लालबागचा राजाच्या चरणी ठेवण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चे शिवडी विधानसभाचे आमदार सुधीर साळवी यांच्या नावाचा उल्लेख या चिठ्ठीमध्ये करण्यात आला.
-
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात
पुणे- मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडवर विसर्जन मार्गासाठी निघाला. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली. गर्जना, ढोल पथकाकडून ढोल वादन करत सादरीकरण करण्यात येतंय.
-
पुणे- मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात
पुणे- मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात पोहोचला. पारंपरिक पद्धतीने पालखीत विराजमान असणाऱ्या गणपतीचं संबळ वादन करत, भंडारा, पिवळा धूर उधळत स्वागत करण्यात आलं.
-
Maharashtra News: पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात
पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात… 21 मंडळ मिरवणुकीत सहभागी… लाकडी बा इथून सुरू होणार विसर्जन मिरवणूक…
-
Maharashtra News: विधनसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचं सरकार येईल – एकनाथ शिंदे
विधनसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचं सरकार येईल… असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तर, ज्या जागांवर मार्ग निघाला नाही त्यावर चर्चा करु… महायुतीचं जागावाटपाचं काम बऱ्यापैकी झालं… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: मुंबई, पुण्यात जल्लोषात बाप्पाची मिरवणूक
मुंबई, पुण्यात जल्लोषात बाप्पाची मिरवणूक… लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गर्दी… पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक
-
Maharashtra News: कसबा गणपती विसर्जन मिरवणूक बेलबाग पोहचली
कसबा गणपती विसर्जन मिरवणूक बेलबाग पोहचली आहे… परशुराम ढोल पथकाकडून ढोल वादन करण्यात येत आहे…
-
महाराष्ट्राचे राज्यपाल फडणवीसांच्या घरी
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले आहेत. राज्यपाल सीपी राधाकृष्णन देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेणार आहेत. आज गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्याआधी राज्यपाल त्या ठिकाणी पोहोचलेत.
-
नंदुरबारमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 200 पेक्षा अधिक गणरायाच्या आज विसर्जन होणार आहे. कुठलाही अनिश्चित प्रकार घडवून यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जात असतो.
-
लालबागचा राजाची शेवटची आरती संपन्न
लालबागचा राजाची शेवटची आरती संपन्न झाली आहे. गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीआधी लालबागचा राजाची शेवटची आरती करण्यात आली. आता थोड्याच वेळात लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
-
तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरूवात
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. पारंपरिक पालखीतून पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विष्णू नाद शंख पथकाकडून करण्यात शंखनाद करण्यात आला. न्यु गंधर्व बँडच्या वादनात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
-
Ganpati Visarjan 2024 LIVE : लालबागमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सकाळपासूनच गर्दी
मुंबई – महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता लालबागमध्ये मोठ्या उत्साहात होत आहे. लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला
लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे, १लालबागमधील रस्ते आज गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत…
जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाची आज राजेशाही मिरवणुक काढण्यात येणार आहे
राजेशाही विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तास चालणार आहे, उद्या सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन होणार आहे….
बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होऊ लागली आहे
सकाळी ९:३० वाजता विधिवत पूजा आणि आरती करण्यात येणार आहे, त्यानंतर लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधून निघणार आहे
-
Ganpati Visarjan 2024 LIVE : नांदेडमधील 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
नांदेड – आज दिला जाणार लाडक्या गणरायाला निरोप – 2 हजार 900 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, – 3 कृत्रिम तलाव, 26 मूर्ती संकलन केंद्र. – लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांसह नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज
-
Ganpati Visarjan 2024 LIVE : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनातील तयारी सुरू
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनातील तयारी सुरू
पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार दगडूशेठ गणपतीची आरती
दगडूशेठ गणपती आज चार वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार
अजित पवार दगडूशेठ गणपती मंदिरात येणार
-
Ganpati Visarjan 2024 LIVE : मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी सज्ज
पुण्यात थोड्या वेळात विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी निघणार
रथ सजवून तयार करण्यात आला आहे
थोड्या वेळात मिरवणुकीला होणार सुरुवात
Published On - Sep 17,2024 9:13 AM