घणसोलीसाठी झटणारा नेता काळाने हिरावला, दीपक पाटील यांचं निधन

घनसोलीसाठी झटणारा नेते काळाने हिरावून नेलाय. घणसोलीचे माजी नगरसेवक, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक दगडू पाटील यांचं निधन झालंय. | Deepak patil Pass Away

घणसोलीसाठी झटणारा नेता काळाने हिरावला, दीपक पाटील यांचं निधन
Deepak patil
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:04 AM

नवी मुंबई : घनसोलीसाठी झटणारा नेते काळाने हिरावून नेलाय. घणसोलीचे माजी नगरसेवक, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक दगडू पाटील यांचं निधन झालंय. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. (Ghansoli Congress Leader Deepak Patil Dies At 55)

मंगळवारी सायंकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृतीने साथ न दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. नवी मुंबई महापालिकेच्या 1995 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 1995 आणि 2000 असे सलग दोन वेळा ते निवडून आले होते.

त्यावेळी महापालिकेच्या इतिहासात वाढीव मालमत्ता कराविरोधात पहिलेच आंदोलन केले होते. तसेच आरोग्य समितीचे सभापती म्हणून गोरगरीबांसाठी त्यांनी अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला. आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात त्यांनी महासभेत आवाज उठवून अनेक प्रकरणे उजेडात आणली. 2010 मध्ये त्यांच्या पत्नी शोभा पाटील नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

घणसोली गावातील वीजेच्या समस्यांसंदर्भात घणसोलीत उर्जामंत्री नितीन राऊत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मार्फत गेल्या 15 दिवसापूर्वी महावितरणच्या भांडूप विभागाने पाहणी दौरा केला. ते जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम लढत असायचे. समाजतल्या अंतिम माणसाचं काम आपल्या हातून मार्गी लागावं, यासाठी ते प्रयत्नशील असायचे.

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे – वाशी रेल्वे सेवा सुरु व्हायच्या आधी घणसोली रेल्वे स्टेशनला ‘उद्यम नगर’ असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी दीपक पाटील यांनी आंदोलन करून तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक यांची भेट घेवून ‘घणसोली’ स्टेशन नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या पश्चात पत्नी,आई,एक मुलगा,एक मुलगी, दोन भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे.

(Ghansoli Congress Leader Deepak Patil Dies At 55)

हे ही वाचा :

पत्रकारांसाठी संजय राऊतांची लेखणी कडाडली, म्हणाले, ‘आज काही लोक सुपात, उद्या ते ही जात्यात येतील!’

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.