आर्यन खान खंडणी प्रकरण, सहआरोपी सॅम डिसुजाला कोर्टाचा दिलासा देण्यास नकार, समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार?

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये सॅम डिसुजा हा स्वतंत्र साक्षीदार आहे. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात तो आरोपी आहे.

आर्यन खान खंडणी प्रकरण, सहआरोपी सॅम डिसुजाला कोर्टाचा दिलासा देण्यास नकार, समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:08 PM

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांना आर्यन खान खंडणी प्रकरणात हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. मात्र याच गुन्ह्यात सहआरोपी असणाऱ्या सॅम डिसुजाला मात्र हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलाय. सॅम डिसुजा हा सीबीआयने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात पाच नंबरचा आरोपी आहे. डिसुजाला अंतिम दिलासा देण्यास नकार देताना हायकोर्टाने सीबीआय चौकशीलासुद्धा सामोरे जायला सांगितलेलं आहे. मात्र डिसुजाच्या चौकशीमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

डिसुजावर अटकेची टांगती तलवार

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये सॅम डिसुजा हा स्वतंत्र साक्षीदार आहे. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात तो आरोपी आहे. एसआयटी आणि सीबीआयच्या गुन्ह्यानुसार आर्यनच्या सुटकेसाठी पूजा ददलानीसोबत 25 कोटींची डील करू पाहणारे सॅम डिसुजा आणि केपी गोसावी आहेत. समीर वानखडे यांच्या सूचनेनुसार ते काम करत असल्याचे सुद्धा सीबीआयने यापूर्वी म्हटलंय. त्यामुळे सॅम डिसुजा याच्यावरती आता अटकेचे टांगती तलवार असणार आहे.

डिसुजाने सीबीआयचा गुन्हा रद्द करण्यासाठी आणि त्या गुन्ह्यात अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टात केलेले याचिकेत एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंग यांच्या वरती गंभीर आरोप केलेत. जून 2021 मधल्या एका ड्रग्स प्रकरणामध्ये आरोपी न बनवण्यासाठी ज्ञानेश्वर सिंग यांना नऊ लाख रुपये दिले असल्याचा दावा डिसुजाने याचिकेत केला होता. मात्र मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होण्यापूर्वीच अंतरिम दिलासा देण्यास नकार देत ही याचिका मागे घेण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या.

हे सुद्धा वाचा

सिंग यांना ९ लाख दिल्याचा आरोप

डिसुजाच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतलेली आहे. याचिकेत नमूद असलेल्या गोष्टीनुसार सॅम डिसुजाला जून 2021 मध्ये एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आल होतं. त्यानुसार तो एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. त्यावेळी एका त्रयस्थ व्यक्तीने अटक न होण्यासाठी 15 लाख रुपये द्यावे लागतील, असं त्याला सांगितलं. घरच्यांना कळवण्यास सांगण्यात आलं. या प्रकारानंतर घाबरून जाऊन सॅम डिसुजाने तडजोडीअंती 9 लाख रुपये ज्ञानेश्वर सिंग यांना दिल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय. शिवाय 5 लाख रुपये व्ही व्ही सिंग यांनाही देण्यात आल्याचा दावा केलाय.

दबाव टाकण्यात आल्याचा डिसुजाचा दावा

याचबरोबर सॅम डिसुजाचा मित्र विजय प्रताप सिंग याने नोव्हेंबर 2021 मध्ये शाहरुख खानला एनसीबीच्या एसआयटी दिल्ली कार्यालयात पाहिलं असल्याचं नमूद केलंय. शाहरुख खान आणि एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतरच समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून आर्यन प्रकरणात खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला, असा जबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा सॅम डिसुजाने याचिकेत केला होता.

मुंबई हायकोर्टाने या गोष्टी न ऐकताच अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलाय. त्यामुळे ज्ञानेश्वर सिंग आणि समीर वानखेडे यांच्यात जरी आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी सॅम डिसुजा सीबीआय चौकशीला सामोरे गेल्यास अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होणार आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.