काऊंटडाऊन सुरु, कॉलेज कधी सुरु होणार? मंत्री उदय सामंत म्हणतात…

अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. (Uday Samant Comment On College Reopen)

काऊंटडाऊन सुरु, कॉलेज कधी सुरु होणार? मंत्री उदय सामंत म्हणतात...
उदय सामंत

मुंबई : येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार आहे, असे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. (Uday Samant Comment On College Reopen)

“राज्यातील कोव्हिडचं प्रमाण कमी होत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद सुरक्षितता पाळणं  हे आपलं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचं कोव्हिडपासून सरंक्षण व्हावं, यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. येत्या काही दिवसात लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालय कधी सुरु करायची याबाबत विचार उच्च आणि  तंत्रशिक्षण विभागातर्फे केला जात आहे.”

“येत्या 8 ते 10 दिवसात याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, कॉलेज, वसतिगृह याबाबतचा चर्चा निर्णय घेतला जाईल. यानंतर येत्या 20 जानेवारीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील महाविद्यालय सुरु करता येतील का? काही नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरु आहे,” असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे यांसह इतर विषयांवर उदय सामंतांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.

“राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी विविध विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय जाहीर करु,” असेही उदय सामंत यांनी सांगितले.

“प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल,”  असे त्यांनी स्पष्ट केले. (Uday Samant Comment On College Reopen)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांनो, तुम्ही हवा नाही, विष शरीरात घेताय!

घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?

Published On - 7:06 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI