कोरोना मुक्तीनंतंर फंगल इन्फेक्शनच्या तक्रारींमध्ये वाढ, काळजी घ्या

कोरोनामुक्ती नंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा बुरशीजन्य आजार झालेल्या महिलेचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा तक्रारी समोर येत आहेत.

कोरोना मुक्तीनंतंर फंगल इन्फेक्शनच्या तक्रारींमध्ये वाढ, काळजी घ्या

मुंबई : परळ येथील ग्लोबल रूग्णालयात कोरोनामुक्ती नंतर ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा बुरशीजन्य आजार झालेल्या महिलेचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या बुरशीजन्य संसर्गाने हाडांची झीज होणे, स्नायू कमकुवत होणे, डोळ्यांवर दुष्परिणाम होणे अशा तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून हा अतिशय जीवघेणा आजार आहे. या रूग्णांची संख्या सध्या वाढताना दिसून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी फंगल इन्फेक्शनवर तातडीने उपचार व्हावेत असा सल्ला दिला जात आहे.(Increased incidence of fungal infections in people who have had corona free)

परळमधील ग्लोबल रुग्णालयात क्लिनिक सुरु

या त्वचारोगावर उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रूग्णालयात ‘म्युकॉरर्मायकोसिस’ क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ‘फंगल इन्फेक्शन’ वर उपचार करणारे मुंबईतील हे पहिले क्लिनिक ठरले आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या शैला सोनार यांना कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने आणि रक्तातील साखरेच्या कमतरतेमुळे ‘म्यूकोर्मिकोसिस’ हा दुर्मिळ आजार झाला होता. या महिलेच्या नाकात आणि डोक्यापर्यंत हा संसर्ग पोहोचला होता. स्थानिक रूग्णालयात या महिलेवर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्रास वाढू लागल्याने कुटुंबियांनी तिला डिसेंबर २०२० रोजी मुंबईतील ग्लोबल रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी संबंधित महिलेवर अँटी-फंगल थेरपी सुरू करण्यात करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे संसर्ग झालेल्या डोक्यावरील टाळूचा अर्धा भाग काढून टाकण्यात आला. वेळीच उपचार झाल्याने या महिलेचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

‘म्युकॉरर्मायकोसिस’ मुळे कोणता धोका?

सर्जन डॉ. मिलिंद नवलखे सांगितले की, म्यूकोर्मिकोसिस आजाराचा मधुमेह रूग्ण आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रूग्णांना याचा धोक अधिक असतो. कोरोनमुक्त झालेले ५० हून अधिक रूग्ण मागील तीन महिन्यात रोगप्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे बुरशीजन्य आजाराचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी आले होते. यात रूग्णाला सर्दी आणि नाकाला सूज येते. यावर वेळीच उपचार न झाल्यास डोळ्यावर परिणाम होऊन दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. परंतु, अनेकांना या आजाराबद्दल माहिती नसल्याने रूग्ण उशीरा डॉक्टरांकडे जातात. अशावेळी वैद्यकीय तपासणी केली असता रूग्णाला म्यूकोर्मिकोसिस असल्याचं निदान होते. अशा स्थितीत संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी शरीरातील ज्या भागात संसर्ग झाला आहे तो भाग काढून टाकावा लागत असल्याचे डॉक्टर सांगतात.

संबंधित बातम्या :

Corona Vaccination | कोरोना लसीकरणावरुन सचिन तेंडुलकरचे हटके ट्विट, म्हणाला….

कोरोनामुळे 10 महिन्यांपासून कुटुंबीयांची गाठभेट नाही, मग व्हिडीओ कॉल आहे ना!, वर्ध्यातल्या तुरुंगाला मायेचा ओलावा

Increased incidence of fungal infections in people who have had corona free

Published On - 9:20 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI