Maharashatra BJP : भाकरी फिरली, ‘या’ गोष्टी अंगलट आल्या, महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची 5 कारणे कोणती?

Lok Sabha Election Results 2024 : देशाच्या सत्तेचा महामार्ग उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रातून जातो. दिल्लीचे तख्त राखण्याचे काम महाराष्ट्र करतो, हे राज्यातील निकालांनी दाखवून दिले. राज्यात सर्वाधिक नुकसान भारतीय जनता पक्षाचे झाले आहे. महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची काय आहे कारण..

Maharashatra BJP : भाकरी फिरली, 'या' गोष्टी अंगलट आल्या, महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची 5 कारणे कोणती?
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 3:17 PM

उत्तर प्रदेशातून सत्तेचा महामार्ग जात असला तरी महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखतो हे पुन्हा एकदा मतांच्या आकड्यांनी दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ दुसरे महत्वाचे राज्य, महाराष्ट्राने भाजपला हाबाडा दिला. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील 9 जागाच भाजपला पदरात पाडून घेता आल्या. 2019 मध्ये राज्यात 25 जागा लढवत 23 जागा मिळवून भाजपने भीम पराक्रम केला होता. पण यंदा सत्तेचे गणित जुळवताना मतांची वजाबाकी केव्हा झाली हे भाजपच्या धुरणींच्या लक्षात आले नाही.

ईडी-सीबीआय कारवाई

ईडी-सीबीआय या संस्थांचा घरगडी असल्यासारखा वापर होत असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या मागे राज्यात ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आल्याचे आरोप झाले. दस्तूरखुद्दा शरद पवारांनी मुंबईत केलेल्या खास आंदोलनामुळे मात्र केंद्रीय संस्थांच्या तोंडचे पाणी पळाले होते. विरोधकांना जेरीस आणण्यासाठी या संस्थांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

ऑपरेशन लोटस

मोठे बहुमत असताना भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले होते. त्यातच भाजपने ऑपरेशन लोटस चालवले. अगोदर शिवसेनेला सुरुंग लावला. सुरत, आसाम ते गोवामार्ग हे नाट्य अवघ्या देशाने पाहिले. एका गटासोबत घरोबा करत सत्तांतर घडविले. तर काही दिवसांनी राष्ट्रवादीचा गड फोडला. या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नसल्याचे मतातून दिसून आले.

मराठा फॅक्टरचा फटका

मराठवाड्यातील आठ जागांचे निकाल समोर ठेवत मराठा फॅक्टरचा मोठा फटका भाजपला बसल्याचे राजकीय विश्लेषक प्रा. गणेश मोहिते यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुडाचे राजकारण सुद्धा जनतेच्या पचनी पडल नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा डीएनए हा वेगळा आहे. सर्वसामावेश आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. भाजपच्या गेल्या काही वर्षांतील राजकारणाने त्याला छेद दिला. जनतेने मत पेटीतून ही नाराजी जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट

पत्रकार आणि तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका भाजपला बसला. केंद्रातील सरकारने तीन महिन्याला दोन हजारांची मदत सुरु केली असली तरी करामुळे खत, बियाणं, शेती आवजारं आणि इतर साहित्य महाग झाले. त्यातच कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही. तर निर्यातीसंबंधीचे तळ्यातमळ्यातील धोरणाने भाजपने शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली.

काँग्रेसला हलक्यात घेणे नडले

काँग्रेस गिणतीतच नाही, असे भाजपचे गृहितक त्यांना नडले. काँग्रेस नावालाच उरली आहे, हा समजही बहुधा नडला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडून काँग्रेसला दे धक्का देण्याच्या प्रयोगातून काहीच हाती लागले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो आणि नंतर न्याय यात्रा काढून प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला. 50 जागांवर पण काँग्रेस निवडून येणार नाही, हा भाजपचा दावा जागा जिंकून काँग्रेसने खोडून काढला.

सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.