विधानसभा निवडणूक : मतदानासाठी मुंबई सज्ज, बंदोबस्तासाठी 40 हजार पोलीस तैनात

Namrata Patil

Updated on: Oct 20, 2019 | 9:14 AM

मतदान सुरळीतरित्या पार पडावं यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी मतदानासाठी 40 हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात (Mumbai Police on duty) आले आहेत.

विधानसभा निवडणूक : मतदानासाठी मुंबई सज्ज, बंदोबस्तासाठी 40 हजार पोलीस तैनात

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. विधानसभा निवडणुकांचे मतदान सोमवारी 21 ऑक्टोबरला पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी मतदान होईल. त्यात मुंबईमधील 36 विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान सुरळीतरित्या पार पडावं यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईत सोमवारी मतदानासाठी 40 हजाराहून अधिक पोलीस तैनात करण्यात (Mumbai Police on duty) आले आहेत.

मुंबईत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईत अतिरिक्त सुरक्षा दलालाही तैनात करण्यात आलं आहे. मुंबईत सीपीएमफच्या 22 कंपन्या, एसआरपीएफच्या 12 कंपन्या आणि 2700 होमगार्डही तैनात असणार आहेत.

मुंबईत शहरात 522 ठिकाणी 2 हजार 594 मतदान केंद्र आहेत. तर उपनगरात 1046 ठिकाणी 7 हजार 397 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यातील जवळपास 269 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. दरम्यान आतापर्यंत निवडणूक आचारसंहिता उल्लघंन केल्याप्रकरणी 34 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली (Mumbai Police on duty) आहे.

मतदानावेळी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात नो पार्किंग लागू करण्यात आली आहे. फोर्स वन, क्यूआरटी, असॉल्ट टीम, दहशतवादविरोधी पथक या सुरक्षा यंत्रणांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहे. तसेच इंटेलिजन्स टीमदेखील मुंबईत ठिकठिकाणी तैनात राहणार आहे.

दरम्यान मुंबई पोलिस दलातील 10 हजारांपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी पोस्टल मत प्रक्रियेद्वारे मतदान करणार आहेत.

मतदानादिवशी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI