Maharashtra | कोरोनाच्या काळानंतरही कौटुंबिक वाद थांबेनात, 43 हजार वाद थेट न्यायालयात, मोबाईल बनतोय वादाचे केंद्र

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोनाने कहर केला. कोरोनाच्या काळात सर्वांनाच घरामध्ये अडकून पडावे लागले. आॅफिस, नोकरीची ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालय सर्व काही बंद होते. यामुळे घरातील सर्वच सदस्य चार भींतीच्या आतच अडकून पडले. पूर्वी कामानिमित्त सर्वजण बाहेर असल्याने ऐकमेंकांनी संपर्क अगदी कमी झालेला.

Maharashtra | कोरोनाच्या काळानंतरही कौटुंबिक वाद थांबेनात, 43 हजार वाद थेट न्यायालयात, मोबाईल बनतोय वादाचे केंद्र
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 9:15 AM

मुंबई : आपल्या देशामध्ये संयुक्त कुटुंब पद्धत आहे. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) संयुक्त कुटुंब फार कमी वेळा बघायला मिळतात. त्यामध्येही संपत्ती आणि पैशांवरून वाद होतात. हे वाद इतकी जास्त टोकाचे असतात की, थेट न्यायालयातच (Court) जाऊन पोहचतात. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात महिलाही घराच्या बाहेर पडून नोकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. यामुळे कुटुंबाला म्हणावा तसा वेळ त्या देऊ शकत नाहीयंत. यामुळे जेवढे छोटे कुटुंब (Family) असेल त्यावर भर दिला जातो. संयुक्त कुटुंब हळूहळू हद्दपार होताना दिसते आहे. भारतामध्ये आता अगदी हातावर मोजण्याइतकेच संयुक्त कुटुंब असावीत.

कोरोनाच्या काळात वाढले कुटुंबातील वाद विवाद

दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोनाने कहर केला. कोरोनाच्या काळात सर्वांनाच घरामध्ये अडकून पडावे लागले. आॅफिस, नोकरीची ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालय सर्व काही बंद होते. यामुळे घरातील सर्वच सदस्य चार भींतीच्या आतच अडकून पडले. पूर्वी कामानिमित्त सर्वजण बाहेर असल्याने ऐकमेंकांनी संपर्क अगदी कमी झालेला. मात्र, लाॅकडाऊनमध्ये 24 तास सर्वांनासोबतच राहण्याची वेळ आल्याने वाद वाढले. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबात कलह सुरू झाले. हे वाद इतके जास्त कोरोनाच्या काळात वाढले की, पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली.

हे सुद्धा वाचा

घरगुती वादाचे कारण ठरतोय छोट्यासा मोबाईलच

2021 मध्ये वर्षभराच्या काळात तब्बल 43 हजार कौटुंबिक वाद कौटुंबिक न्यायालयात पोहचली. 2022 मध्ये राज्यात 18 हजार कौटुंबिक वादाची प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात गेली. पती पत्नीमधील वाद यात सर्वाधिक होते. विशेष म्हणजे घरगुती वाद यामध्ये होतेच. पती पत्नीमध्ये शुल्क कारणावरून वाद झाल्याचे चित्र आहे. सतत मोबाईलचा वापर, चॅटिंग आणि अनोळखी मित्र- मैत्रिणींसोबत बोलणे यावरून कुटुंबातील कलह वाढला. यामध्ये सासू आणि सुनेचे वाद, भावांचे वाद त्याचप्रमाणे पती पत्नी मध्येही वेगवेगळ्या वैयक्तिक कारणांवरून अनेकदा उदभवलेल्या वादाचा देखील त्यात समावेश आहे. यादरम्यान घरगुती वाद सोडवतांना पोलिसांना नाकीनऊ आल्याचे देखील चित्र आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.