AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक पण मोठं राजकीय स्टेटमेंट

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी एक सचूक पण मोठं राजकीय स्टेटमेंट केलं. वरळीत गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी बांधली जातेय. बरीच गोविंदा पथक इथे येत असातत. आधी सचिन अहिर ही दहीहंडी बांधायचे. आता भाजपकडून इथे दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं जातं.

Devendra Fadnavis : दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक पण मोठं राजकीय स्टेटमेंट
Devendra Fadnavis
| Updated on: Aug 16, 2025 | 1:43 PM
Share

“छावा साकारलेला आहे. ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच शौर्य आमच्या गोविंदांनी मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. परिवर्तन दहीहंडी या भागात अनेक वर्षांपासून सुरु आहे. आमच्या गोविंदांकरता आकर्षणाच केंद्र आहे. संतोष पांडे ज्या प्रकारे आयोजन करतात, त्या बद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी वरळी जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर छावा सिनेमातील एक दृश्य साकारण्यात आलं. आजच्या दिवशी राजकीय नेते विविध दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला भेट देत असतात.

दहीहंडी मंचावरुन खाली उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवर्तन दहीहंडीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महानगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे. महानगरपालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतल जे काही लोणी आहे, ते जनसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे”

इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं?

“दहीहंडीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करावा, अशी सर्वांना विनंती आहे” इतकी वर्ष लोणी कुठे जात होतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठे जात होतं, तुम्हाला माहित आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. पण जनतेला माहित आहे, लोणी कोणी खाल्लं”

‘उत्सवावरची बंधनं हटवली’

“दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधन होती, सगळी बंधनं शिंदे साहेबांच सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचं सरकार आहे, सगळी बंधन हटवण्यात आलेली आहेत. प्रचंड उत्साह आहे. उत्साहात दंहीहंडी साजरी होतेय” असं फडणवीस म्हणाले. “रात्रीपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा अंदाज आहे. कितीही पाऊस पडला, तरी गोविंदाच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.