AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : धाकधूक वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या जवळ

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 278 रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा पाहता मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे.

Corona : धाकधूक वाढली! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या जवळ
| Updated on: Apr 03, 2020 | 10:04 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट वाढतच जात (Maharashtra Corona Patients Increased) आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या जवळ येऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 490 कोरोनाबाधित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यातही मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 278 रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा पाहता मुंबईकरांची धाकधूक वाढली (Maharashtra Corona Patients Increased) आहे.

राज्यात आज कोरोनाबाधित 67 नवीन रुग्णांची नोंद झाली आहो. त्यातील 43 रुग्ण मुंबई येथील असून 10 रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील 9 तर अहमदनगर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 490 वर येऊन पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात 6 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू (Maharashtra Corona Patients Increased) झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी प्रत्येकी 1 रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि 2 जण मुंबई येथील आहेत.

आज राज्यात कुठे किती कोरोनाबाधितांचा मृत्यू

  1. वसई विरार येथे मृत्यू झालेला 68 वर्षीय पुरुष हा 29 मार्चला एका खाजगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वडयात अमेरिकेहून आला होता पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता.
  2. बदलापूर ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. त्यामुळे तिला बेडसोर देखील झालेले होते. तिचा कोणत्याही प्रदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.
  3. जळगाव येथे मृत्यू झालेला 63 वर्षीय पुरुष हा जळगाव मधील करोना बाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तादाब होता आणि एक महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला.
  4. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेली 50 वर्षीय महिला 28 मार्चला भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता.
  5. मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू पावलेला 65 वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही परदेश प्रवास केलेला नव्हता.
  6. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका 62 वर्षाच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 26 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे कोठे किती रुग्ण 

  • मुंबई – 278
  • पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – 70
  • सांगली – 25
  • मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – 55
  • नागपूर – 16
  • यवतमाळ -4
  • अहमदनगर -20
  • बुलढाणा – 5
  • सातारा -3
  • औरंगाबाद – 3
  • कोल्हापूर – 2
  • रत्नागिरी – 2
  • सिंधुदुर्ग- 1
  • गोंदिया – 1
  • जळगाव -1
  • नाशिक – 1
  • उस्मानाबाद – 1
  • इतर राज्य – गुजरात – 1
  • एकूण – 490 

राज्यात आज एकूण 595 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 12 हजार 858 नमुन्यांपैकी 11 हजार 968 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 490 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 50 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात 38 हजार 398 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3072 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त 1225 व्यक्तींच्या यादीपैकी 1033 व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी 738 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 7 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर (Maharashtra Corona Patients Increased) भागातील आहेत, तर एक जण हिंगोलीतील आहे.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.