AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, लोकसभेच्या निकालाआधी पडद्यामागे घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, लोकसभेच्या निकालाआधी पडद्यामागे घडामोडींना वेग
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला
| Updated on: Jun 03, 2024 | 10:38 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार खलबतं घडत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निकाल नेमका काय लागेल? ते उद्या स्पष्ट होईलच. पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. लोकसभेच्या निकालाआधीची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला मोलाची मदत केली. विशेषत: मुंबईत राज ठाकरे यांनी महायुतीसोबत असणं जास्त फायद्याचं होतं, असं राजकीय गणित मानलं जात होतं. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कदाचित राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांचे आभार मानण्यासाठी शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाल्याची शक्यता आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर चर्चा?

याशिवाय आगामी काळात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसेची मदत लागणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भाजपकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या भेटीत याबाबत चर्चा होते का? किंवा या विषयावर मार्ग निघतो का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.