AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं भाजपला भारी पडणार? ‘या’ तीन गोष्टींची हाताळणी करताना भाजपाची मोठी कसोटी

Devendra Fadnavis BJP : राज्यात अजित दादांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी समर्थन दिल्याने त्यांचा या पदासाठीचा मार्ग मोकळा मानण्यात येत आहे. पण फडणवीस यांना मुख्यमंत्री पदी बसवल्यानंतर या तीन गोष्टींची हाताळणी करणे काही सोपं नाही.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं भाजपला भारी पडणार? 'या' तीन गोष्टींची हाताळणी करताना भाजपाची मोठी कसोटी
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
| Updated on: Nov 26, 2024 | 12:08 PM
Share

महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळाले. पण मुख्यमंत्री पदावरून घोडं अडलं आहे. महायुतीमध्ये भाजपाच्या 132 जागा आल्या आहेत. त्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असल्याचा दावा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणाना सुद्धा श्रेय दिल्या जाते. आता अडचण ही आहे की, राज्यात एकाच वेळी दोन मुख्यमंत्री करता येत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. तर शिंदे सेना बिहार मॉडलची चर्चा करताना दिसत आहे. शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नाव लावून धरले आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा श्रेष्ठींचे पहिली पसंत आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पण तसं करताना या तीन मुद्दांना भाजपाला दुर्लक्ष करून चालणार नाही.

ओबीसी मतांची बिदागी आणि ब्राह्मण मुख्यमंत्री

भारतीय जनता पक्ष गेल्या दशकापासून सोशल इंजिनिअरिंगला अधिक महत्त्व देत आला आहे. त्यामुळे मुख्य पदावर ओबीसी चेहरा असणे सर्वात चांगले, अशी एक धारण आहे. भाजपाने राष्ट्रपतीपासून ते राज्यपालांपर्यंत अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य दिले आहे. सध्या जातनिहाय जनगणनेविषयी राहुल गांधी आक्रमक दिसत असतानाच ओबीसी मतांवर ब्राह्मण मुख्यमंत्री पदावरून विरोधक हल्लाबोल करू शकतात. विरोधक अगोदरच भाजपाला सवर्ण आणि श्रीमंतांचा पक्ष म्हणून निशाणा करत आहे. ज्या समाजाची जितकी लोकसंख्या, तितका त्याचा अधिकार अशी चर्चा सुरू आहे. आता बिहार आणि दिल्लीतील निवडणुका तोंडवर असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर फडणवीस यांचे नाव पुढे करताना भाजपाला हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची चिन्हं आहेत.

एकनाथ शिंदे यांना नाराज करून कसं चालेल?

महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यावेळीचे शिवसेनेतील बंड महत्त्वाचे ठरले होते. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागांवर यश मिळवले आहे. तर अजित पवारांकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे. जर वाटाघाटी सामोपचाराने झाल्या नाही तरी भाजपाकडे अजितदादांच्या भरवशावर सत्ता स्थापनेला अडचण नाही. पण राजकीय तज्ज्ञांच्या मते हा धोका भाजपा स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांना डावलून अथवा त्यांची नाराजी ओढवून सत्तेत वाटेकरी होण्याचा मार्ग भाजपाला अडचणीचा ठरेल. दुसरीकडे वाटाघाटी फिसकटल्या तर शिंदे यांचे 57, अजितदादांचे 41 आणि महाविकास आघाडीचे 46 असे मिळून सत्ता स्थापन केल्यास हा आकडा 144 पर्यंत येतो. 288 आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी या नवीन आघाडीला सुद्धा एक जागा कमी पडू शकते.

फडणवीसांवर मराठा समाजाची नाराजी

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी एकदम समोर आली. मराठा पट्ट्यात भाजपाला मोठा फटका बसला. मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दिसून आली. मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघड मोर्चा उघडला. राज्यात मराठा आणि ओबीसी असा सामना सर्वांनीच पाहिला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यास हा धोका समोर येऊ शकतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा