Lockdown: राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन अटळ, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा?

अजित पवार यांनी राज्यात सध्या नियमावलीत बदल करून अजून कडक नियम करण्याची गरज व्यक्त केली. | Maharashtra Lockdown Ajit Pawar

Rohit Dhamnaskar

| Edited By: Yuvraj Jadhav

Apr 20, 2021 | 12:04 PM

मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बंध (New Lockdown curbs) लादण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले मत कळवले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra govt may imposed new and strict lockdown curbs soon)

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी राज्यात सध्या नियमावलीत बदल करून अजून कडक नियम करण्याची गरज व्यक्त केली. सध्या अनेक लोकांचा अत्याआवश्यक सेवेत समावेश करण्यात आले आहे. ती संख्या कमी करावी असे मत अजित पवार यांनी मांडल्याचे समजते.

किराणा दुकानांची नवी वेळ आज ठरणार

राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार (Thackeray govt) अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Thackeray govt cabinet meet today may take decision about shops and strict lockdown)

संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहणार आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारला विनंती आहे की, अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा युक्तिवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.

दिल्लीतही केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे आता केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे मंगळवारी देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी एखादा महत्त्वाचा निर्णय घेतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

(Maharashtra govt may imposed new and strict lockdown curbs soon)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें