VIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी

मुंबईच्या एक्सप्रेस वे वर रात्रीच्या सुमारास एका मासे भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला. यावेळी टेम्पो एका दिशेने कलांडला गेल्याने त्यात असलेले सर्व मासे रस्त्यावर पडले. (Maharashtra Mumbai Eastern Freeway Highway A tempo carrying loads of fish crashes People rush for collect it)

VIDEO | मुंबई एक्सप्रेस फ्री वेवर माशांनी भरलेला टेम्पो उलटला, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी
Mumbai Freeway Highway A tempo fish crashes
ब्रिजभान जैस्वार

| Edited By: Namrata Patil

Jun 17, 2021 | 8:32 AM

मुंबई : मुंबईच्या एक्सप्रेस फ्री वे वर काल रात्री मासे असलेल्या एक टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्या टेम्पोचा चालक जखमी झाला. तर अपघातामुळे टेम्पोमध्ये असलेले सर्व मासे रस्त्यावर पडले. यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी ते गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Maharashtra Mumbai Eastern Freeway Highway A tempo carrying loads of fish crashes People rush for collect it)

या व्हिडीओनुसार, मुंबईच्या एक्सप्रेस वे वर रात्रीच्या सुमारास एका मासे भरलेल्या टेम्पोचा अपघात झाला. यावेळी टेम्पो एका दिशेने कलांडला गेल्याने त्यात असलेले सर्व मासे रस्त्यावर पडले. यानतंर नागरिकांनी ते घेण्यासाठी एकच गर्दी केली. अनेक जण हे प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि मासे नेण्यासाठी एकच गर्दी केली. अनेक जण हे मासे बॅगेत, पिशवी किंवा जे मिळेल त्यात भरुन घेऊन जात आहे.

तर दुसरीकडे या टेम्ंपोचा चाल जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या आलं आहे. तसेच थोड्या वेळाने घटनास्थळी अग्निशमन दलाची टीमही दाखल झाली. त्यांनी त्या ठिकाणी पडलेले डिझेल साफ केले. तसेच तिकडच्या स्थानिकांनी जर हे मासे नेले नसते, तर त्यामुळे इतर वाहनांचा अपघात झाला असता. सध्या पोलिसांकडून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.

(Maharashtra Mumbai Eastern Freeway Highway A tempo carrying loads of fish crashes People rush for collect it)

संबंधित बातम्या : 

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

बोरिवलीतील पुलाचा खर्च 300 टक्क्यांनी वाढला, स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळला

“मान्सूनने वेगात आगमन केलं, आता पुन्हा जोर धरावा आणि सर्वत्र राज्यात झोकात बरसावं, नाहीतर पेरण्यांसाठी चिंतेची बाब”

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें