AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के, विश्वासू आमदार सोडून गेला, दुसऱ्याची जाहीर नाराजी, काँग्रेसकडून हल्ला

ShivSena Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचे जागा वाटप वंचित आघाडीमुळे रखडल्याची चर्चा आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उबाठाला धक्क्यांवर धक्के बसले आहेत.

उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के, विश्वासू आमदार सोडून गेला, दुसऱ्याची जाहीर नाराजी, काँग्रेसकडून हल्ला
uddhav thackeray
| Updated on: Mar 11, 2024 | 8:04 AM
Share

मुंबई | दि. 11 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीचे जागा वाटप वंचित आघाडीमुळे रखडल्याची चर्चा आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उबाठाला धक्क्यांवर धक्के बसले आहेत. उद्धव ठाकरे यांचा विश्वासू आमदाराने त्यांची साथ सोडली आहे. आमदार रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. कमिशनचा हिस्सा मिळाला म्हणून अमोल कीर्तिकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.

आधी भास्कर जाधव यांचा हल्ला

भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेतला. हा स्नेह मेळवा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करण्यासाठीच झाला. आपण २०२४ विधानसभा निवडणुकपर्यंत पक्ष सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. परंतु पक्षात होत असलेली घुसमट जाहीरपणे मांडली. सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद दिले नाही, त्यानंतर शिवसेना फुटली तेव्हा गटनेतेपद दिले नाही. भविष्यातही मला पद मिळणार नाही. परंतु मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी सांगितले. ही साथ २०२४ च्या विधानसभेपर्यंतच असणार की काय? अशी चर्चा त्यानंतर रंगली.

रवींद्र वायकर यांनी सोडली साथ

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळख असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रविवारी प्रवेश झाला. विशेष म्हणजे आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांचे गोरेगाव येथे रवींद्र वायकर यांनी स्वागत केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षांतर करत उद्धव ठाकरे यांना धक्का दिला.

काँग्रेसकडून जोरदार हल्ला

महाविकास आघाडीतील घटन पक्ष असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संजय निरुपम यांचा संताप झाला. कोरोना काळातील गरिबांच्या खिचडी वाटप घोटाळ्यातील आरोपीची उमेदवारी जाहीर करण्याची घाई का केली? असा प्रश्न त्यांनी मांडला. कमिशनचा हिस्सा पोहचल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, असा आरोप निरुपम यांनी केला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.