AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घाडमोड! शरद पवार उद्याच्या तिरंगा मोर्चात? राज ठाकरे यांचे आमंत्रण स्वीकारणार?

Raj Thackeray Sharad Pawar- Tiranga March: उद्या ठाकरे बंधुंचा मुंबईत तिरंगा मोर्चा आहे. शरद पवार हे उद्याच्या तिरंगा मोर्चात सहभागी होतील का याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी घाडमोड! शरद पवार उद्याच्या तिरंगा मोर्चात? राज ठाकरे यांचे आमंत्रण स्वीकारणार?
राज ठाकरे, शरद पवार, तिरंगा मोर्चा
| Updated on: Jul 25, 2026 | 12:38 PM
Share

Raj Thackeray Sharad Pawar- Tiranga March: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिलं उद्याच्या तिरंगा मोर्चाचे आमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. उद्याच्या तिरंगा मोर्चासंदर्भात रणनीती आखली आहे. त्यामुळे उद्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसकडून या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचे सांगून पाठिंबा दर्शवला आहे. काल मीना ताई ठाकरे पुतळ्याजवळ काढण्यात आलेल्या राष्ट्रगीत मोर्चामध्ये देखील शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील सहभागी झाले होते. त्यामुळे उद्या देखील शरद पवार पक्ष पाठिंबा देणार का हे बघणे महत्त्वाचे आहे.

राज ठाकरे यांनी घेतली बैठक

तिरंगा मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी सुरू असून या संदर्भात राज ठाकरे यांनी मुंबईतील 36 विभागाची बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या पदाधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याचे समजते. छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणाहून सिद्धिविनायक मंदिर पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चामध्ये प्रत्येकाने तिरंगा झेंडा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा राजकीय मोर्चा नसून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चाविषयी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी परवा याविषयी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी माहिती दिली होती.

आंदोलनामध्ये घुसखोरी करणार्‍याला धडा शिकवायचा

हे आंदोलन राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी आहे. त्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे उद्या होणारा तिरंगा मोर्चा हा शांततेत झाला पाहिजे असे राज ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. आंदोलनामध्ये घुसखोरी करणाऱ्याला धडा शिकवायचा असे मनसेने ठरवले आहे. त्यासाठी एक टीम तयार केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या आंदोलनात गैरप्रकार करणाऱ्यांचा यथोचित सन्मान करून पोलिसांच्या हवाली करण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधा तिरंगा मोर्चाचं महत्त्व पटवा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना असे निर्देश दिले आहेत. तिरंगा मोर्चात अधिकाधिक सहभागासाठी पालकांपर्यंत पोहोचण्याच्या राज ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. तिरंगा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हीच आपली जबाबदारी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे-संजय राऊत यांच्यात बैठक

राज ठाकरे आणि संजय राऊत यांची शिवतीर्थावर  बैठक झाली, राऊत आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. समन्वय, भूमिका आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहभागावर चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवारांची फोन वरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?