AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बटणाने टॅक्सीचं मीटर फास्ट, मनसे नेते नांदगावकरांचा दावा, टॅक्सी फोडण्याचाही इशारा

मुंबईतील टॅक्सीचालक गुप्त बटणाद्वारे टॅक्सीचं मीटर फास्ट करतात आणि प्रवाशांना लुबाडतात, असा दावा मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी टॅक्सीमध्ये व्हि़डीओ शूट करुन केला आहे

बटणाने टॅक्सीचं मीटर फास्ट, मनसे नेते नांदगावकरांचा दावा, टॅक्सी फोडण्याचाही इशारा
| Updated on: Sep 15, 2019 | 10:04 AM
Share

मुंबई : मुंबईतील 85 ते 90 टक्के टॅक्सींमध्ये गुप्त बटण बसवलेलं असून त्याद्वारे मीटर फास्ट केलं जातं आणि प्रवाशांकडून अधिक पैसे उकळले जातात, असा दावा मनसे नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar on Taxi Meter) यांनी केला आहे. मुंबईतील एका टॅक्सीमधून व्हिडीओ शूट करत नांदगावकरांनी टॅक्सीवाल्याचा पर्दाफाश (Nitin Nandgaonkar on Taxi Meter) करण्याचा प्रयत्न केला. बटणवाली टॅक्सी दिसली की ती फोडण्याचा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीचा त्रास आतापर्यंत अनेक मुंबईकरांनी सहन केला असेल. खुद्द राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टॅक्सी एजंटच्या गैरवर्तनाबाबत ट्विटरवर वाचा फोडली. त्यानंतर नितीन नांदगावकर यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. नांदगावकरांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करुन ही कथित हातचलाखी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

वाहतूक पोलिस सामील?

दादर टर्मिनस, मुंबई सेंट्रल, मुंबई विमानतळ या ठिकाणी आढळणाऱ्या बहुसंख्य टॅक्सींमध्ये ही ‘गुप्त कळ’ असल्याचं नांदगावकरांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांना याविषयी माहिती असून प्रवासीच आतापर्यंत अनभिज्ञ होते, असाही आरोप नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar on Taxi Meter) यांनी केला आहे.

समाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू? मनसे नेते नितीन नांदगावकरांचा सवाल

‘दादर, भायखळा, मुंबई सेंट्रल, कुर्ला ,चर्चगेट, बांद्रा, एअरपोर्ट सगळीकडे प्रवाशांची लूटमार खुलेआम चालू आहे. कृपया प्रवाशांनी मीटरवर लक्ष द्यावं, नाहीतर 300 ते 400 रुपये जास्त उकळण्यासाठी मीटर फास्ट बटण वापरुन लुटण्याचा धंदा करणारी टॅक्सी चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, यासाठी काळजी घ्यावी.’ असं आवाहन नांदगावकरांनी केलं आहे.

टॅक्सी फोडण्याचा इशारा

मुंबईत उद्यापासून एकही टॅक्सी बटणवाली दिसली, तर टॅक्सी जागेवर तोडली जाईल. ट्राफिक पोलिसांकडून ही अपेक्षा नव्हती. सर्वसामान्य जनतेच्या मेहनतीच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या समाजकंटकांना तुम्ही पोसता. नुसती टॅक्सी नाही तर तुमच्या सगळ्यांची वरात काढणारच. लुटमारीचे धंदे बंद करायचे नाहीतर टॅक्सी भंगारात दिसेल’ असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.

यापूर्वीही, वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदगावकरांनी व्हिडीओ शेअर करत समाजकंटकांना ठोकून काढण्याचा इशारा दिला होता.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत.

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर ते अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात. पोलिसांनी नांदगावकरांना मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.