मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोर

महापालिका निवडणुका लांबणवीर गेल्या असल्या तरी मनसेने मात्र या निवडणुकांसाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा प्रखरपणे लावून धरण्याचे आदेश दिले.

मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोर
मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या सूचना; हिंदुत्वावरही जोरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:41 PM

मुंबई: महापालिका निवडणुका (bmc) लांबणवीर गेल्या असल्या तरी मनसेने (mns) मात्र या निवडणुकांसाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा प्रखरपणे लावून धरण्याचे आदेश दिले. हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही. पण मराठीचा मुद्दाही जोरकसपणे मांडा. हिंदुत्वाबरोबरच मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशा सूचनाच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या. मराठीबाबत फक्त काही ठरावीक नेत्यांनी न बोलता सर्वांनीच त्यावर बोललं पाहिजे, अशा कानपिचक्याही राज यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा सुटल्याचं चित्रं असतानाच राज ठाकरे यांनी निवडणुकीची संधी साधून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत असून निवडणुकीचा प्रचारही मराठी आणि हिंदुत्वाच्या भोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला. आजच्या बैठकीत दोन ते तीन विषयांवर चर्चा झाली. मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. महिलांनी या जयंतीत मोठ्या संख्येने भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. स्वत: राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे येणार म्हटल्यावर शिवाजी पार्कवर मोठी गर्दी होणार आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

गुढीपाडव्याला राज गर्जना

गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा आयोजित करण्यात येत असतो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा मेळावा झाला नाही. आता येत्या 2 एप्रिल रोजी हा मेळावा होणार आहे. हा मेळावा सुद्धा उत्साहात साजरा करायचा आहे. या संदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत, असंही नांदगावकर यांनी सांगितलं.

आमचा एकटा जीव सदाशिव

यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांवरही भाष्य केलं. निवडणुका कधी होतील? माहीत नाही. पण निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे ताकदीने करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आमचा एकटा जीव सदाशिव सुरू आहे, सोबत आले तर सोबत. नाहीतर सोडून निवडणुका लढवू, असं त्यांनी सांगितलं.

ट्रेलरचं रुपांतर पिक्चरमध्ये दिसेल

जी नळावरची भांडण राजकारणात सुरू आहेत ते पाहता जनतेच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल एक भावना तयार झालेली आहे. जे काही करू शकते फक्त राज ठाकरेच करू शकतात. तुम्ही थोडी वाट पाहा तुम्हाला सुद्धा ट्रेलरचे रुपांतर पिक्चरमध्ये झालेले दिसेल, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO | बॉम्ब कुठंय? धनंजय मुंडेंचे विधानसभेत हातवारे, विरोधकांना विचारणा, दंडही थोपटले!

VIDEO: मोदी लोकसभेत येताच ‘मोदी… मोदी’च्या घोषणा; भाजप खासदारांकडून पंतप्रधानांचं अनोखं स्वागत

साखर कारखाने विक्री, अनियमितता आणि अण्णा हजारेंची तक्रार, विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं, ते प्रकरण नेमकं काय?

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.