आरोपांच्या मालिकेनंतर एनसीबीची कारवाई थंडावली! तक्रारी आल्यानंतर कारवाया थांबवण्याचे वरिष्ठांचे आदेश

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर आता एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई थंडावल्याचं पाहायला मिळत आहे.

आरोपांच्या मालिकेनंतर एनसीबीची कारवाई थंडावली! तक्रारी आल्यानंतर कारवाया थांबवण्याचे वरिष्ठांचे आदेश
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी


मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्याचबरोबर एनसीबीवर अन्य बोगस कारवायांचाही आरोप करण्यात आला आहेत. अशावेळी एनसीबीने मोठा निर्णय घेतलाय. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर आता एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई थंडावल्याचं पाहायला मिळत आहे. (NCB’s action slowed down after allegations against Sameer Wankhede)

समीर वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार दिवसांपासून कारवाई थंडावली आहे. गेल्या आठवड्याभरात एकही कारवाई किंवा धाड मारण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर आर्यन खान प्रकरणातही कारवाई करण्यात आलेली नाही. एनसीबीला कारवाई करण्यास दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. काही दिवस कारवाई नको, असं आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात एनसीबी विरोधात अनेक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

अनन्या पांडेलाही पुढे चौकशीला बोलावलं नाही

एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्स प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरुपाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी झाली आहे. त्यानंतर तिला पुन्हा सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, पुढे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनन्याचं समन्स रद्द करण्यात आलं आहे. त्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. तसंच पुढे नवा गुन्हाही दाखल झालेला नाही. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत. त्यामुळे एकूणच सर्व आरोपानंतर एनसीबीची कारवाई ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.

25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी

क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी.गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. मात्र, 25 कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर हजर व्हावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलंय. तर, के.पी.गोसावी यानं देखील एनसीबी समोर येऊन बाजू मांडावी,असंही सिंह म्हणाले.

ज्ञानेश्वर सिंह नेमकं काय म्हणाले?

प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर आज पाच सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली. आम्ही इथल्या युनिटला विनंती केली होती की, जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांना नोटीस पाठवली जावी त्यांनी मीडियात जे काही तथ्य सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले. मी मीडियाच्या माध्यमातून के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या इशाराऱ्यावर नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी, सोमय्यांचा थेट आरोप

समीर वानखेडेंची चौकशी करणारी टीम चुकांवर पांघरून घालणारी नसावी, जयंत पाटलांचा खोचक टोला

NCB’s action slowed down after allegations against Sameer Wankhede

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI