AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईत धावणारी मोनोरेल अचानक एका बाजूला झुकली, प्रवाशांत घबराट

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवाही चांगलीच स्लो झालेली आहे. परिणामी रेल्वे स्थानकावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. असे असताना आता चेंबूर-भक्तीपार्कदरम्यानची मोनोरेल मध्येच थांबवल्याचे समोर आले आहे. ही मोनोरेल नेमकी का थांबवली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मोनोरेलमधील एसीही बंद पडल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी! मुंबईत धावणारी मोनोरेल अचानक एका बाजूला झुकली, प्रवाशांत घबराट
monorail
| Updated on: Aug 19, 2025 | 7:41 PM
Share

Mumbai Monorail : मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवाही चांगलीच स्लो झालेली आहे. परिणामी रेल्वे स्थानकावर लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. असे असताना आता चेंबूर-भक्तीपार्कदरम्यानची मोनोरेल मध्येच थांबवल्याचे समोर आले आहे. ही मोनोरेल नेमकी का थांबवली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मोनोरेलमधील एसीही बंद पडल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार चेंबूर ते भक्तीमार्ग यादरम्यानची मोनोरेल मध्येच थांबवण्यात आली आहे. या मोनोरेलमध्ये भरपूर सारे प्रवासी आहेत. अचानक मोनोरेल थांबल्यामुळे प्रवाशांत घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रवाशांचा गुदरमतोय श्वास

गेल्या पाऊण तासापासून ही मोनोरेल अडकून पडलेली आहे. चेंबूर आणि भक्तीपार्कदरम्यान ही मोनोरेल थांबवण्यात आलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. या मोनोरेलमधील एसीही बंद पडल्याचे म्हटले जात आहे.

आपत्कालीन क्रमांक करण्यात आला बंद

अचानकपणे मोनोरेल थांबवण्यात आल्याने लोकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे. मोनोरेलमधील प्रवाशांनी आपत्कालीन विभागाला कॉल केल्यानंतर लवकरच आम्ही मदतीला पोहोचत आहोत, असे सांगितले जात आहे. आता हा आपत्कालीन क्रमांक बंद येत असल्याचाही दावा प्रवाशांकडून केला जातोय. ही मोनोरेल नेमकी का थांबवण्यात आली, याचे ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मोनोरेल एका बाजूने झुकली

या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीनुसार थांबवण्यात आलेली ही मोनोरेल एका बाजून झुकलेली आहे. त्यामुळे अपघाताचीही भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदत पोहोचवली जात असून थांबवण्यात आलेल्या मोनोरेलला ओढत नेले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रवाशांकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न

मोनोरेल अचानकपणे थांबल्यानंतर प्रवाशांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रवाशांनी पोलिसांनाही कॉल करण्याचा प्रयत्न केला. काही प्रवाशांनी अग्निशमन दलालाही कॉल केला. मात्र अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मोनोरेलमधील प्रवाशांना सुखरूप कसे काढले जाईल, अशी विचारणा केली जात आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.