पॅलेस्टाईन-इस्त्रायल वादावर सोशल मीडियावर पोस्ट, मुख्याध्यापिकेस गमवावी लागली नोकरी

pro Palestine School Principal terminate: शाळेने यासंदर्भात म्हटले की. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संपूर्णपणे समर्थन करतो, परंतु मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे.

पॅलेस्टाईन-इस्त्रायल वादावर सोशल मीडियावर पोस्ट, मुख्याध्यापिकेस गमवावी लागली नोकरी
parveen shaikh
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 2:14 PM

मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेवर हमाससंदर्भात सहानुभूती दर्शवणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे. मुंबईतील सोमय्या शाळेत गेल्या 12 वर्षांपासून काम करणाऱ्या परवीन शेख यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. शेख यांची या प्रकरणात चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. यामुळे त्यांना नोकरीवरुन काढून टाकले. दरम्यान या प्रकाराबाबत बोलताना परवीन शेख यांनी सोमय्या शाळेने आपणास कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीररित्या पदावरुन हटवल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

सध्या पॅलेस्टाईन (हमास) आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धात हमासला सहानुभूती दर्शवणारी पोस्ट परवीन शेख यांनी केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भातील २४ एप्रिल रोजी एका संकेतस्थळावर वृत्त आले होते. त्याची दखल घेत सोमय्या शाळा व्यवस्थापनाने परवनी शेख यांची चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर त्यांना २६ एप्रिल रोजी राजीनामा देण्यास सांगितले. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांनी आपले काम सुरुच ठेवले.

खुलासा सादर करण्याचे आदेश

सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने परवीन शेख यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शेख यांनी सोमवारी ६ मे रोजी लेखी म्हणणे सादर केले. त्यात त्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. त्यांनी केलेला लेखी खुलासा आणि या प्रकरणाची करण्यात आलेल्या चौकशी प्रक्रियेनंतर त्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेने यासंदर्भात म्हटले की. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संपूर्णपणे समर्थन करतो, परंतु मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे.

हे सुद्धा वाचा

परवीन शेख म्हणतात…

दरम्यान या प्रकाराबाबत परवीन शेख म्हणतात, मला 12 वर्षांच्या सेवेनंतर पदावरून हटवले. या प्रकाराचा मला प्रचंड बसला आहे. 12 वर्षे सेवा देऊनही शाळा व्यवस्थापने सोशल मीडियावरील खोट्या अफवांना बळी पडत माझ्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई राजकीय दबावापोटी केली आहे. या कारवाई विरोधात मी कोर्टात जाण्याचा विचार करत आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.