मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना अँटी पीसीआर चाचणी केली जाणार आहे. (Mumbai School Teacher Corona Antigen test for Safety)

Namrata Patil

|

Nov 20, 2020 | 11:27 AM

मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांच्या कोरोना अँटी पीसीआर चाचणी केली जाणार आहे. येत्या 48 तासात ही टेस्ट होणार आहे. (Mumbai School Teacher Corona Antigen test for Safety)

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही चाचणी होणार आहे. मुंबईत राहणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रावर ही चाचणी करता येणार आहे. यावेळी शिक्षकांना आधारकार्ड आणि शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असणार आहे.

मुंबईतील अनेक पालिका शाळेतील शिक्षकांनी या चाचणीस चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय घेताना खाजगी विना अनुदानित शाळेने चिंता व्यक्त करत शाळांनी खबरदारी घेताना शिक्षण विभागाने यासाठी निधी किंवा साहित्य पुरवावे अशी मागणी केली होती.

यानुसार शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करताना करण्यात येणारी शाळांची स्वछता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडे दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेकडून याची संपूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे.

यात शाळा सुरू होताना शाळेचे सॅनिटायझेशनसाठी सॅनिटाईजर पुरवणे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि इतर साहित्य महापालिका पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांवरील जबाबदारी काही प्रमाणात कमी झाल्याने शाळाचालकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास घेतला.(Mumbai School Teacher Corona Antigen test for Safety)

संबंधित बातम्या : 

Mumbai Malls | मुंबईतील मॉल्सची झाडाझडती, 29 मॉल्सना कारवाईचा इशारा, वाचा संपूर्ण यादी

स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत सहभागी होण्याची मुंबईकरांना संधी; विविध विजेत्यांना मिळून 4 लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें