AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन निवडणूक काळात उत्तर भारतीय संघटनेचा मनसेला इशारा?; म्हणाले, बटोगे तो…

Uttar Bhartiy Sena Poster : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीत काही पोस्टर लक्षवेधी ठरत आहेत. उत्तर भारतीय सेनाने लावलेले पोस्टर सध्या चर्चेत आले आहेत. हा मनसेला इशारा आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. पोस्टरवर नेमकं काय? वाचा सविस्तर बातमी...

ऐन निवडणूक काळात उत्तर भारतीय संघटनेचा मनसेला इशारा?; म्हणाले, बटोगे तो...
उत्तर भारतीय सेना पोस्टरImage Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 02, 2024 | 11:30 AM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचा माहौल आहे. राजकीय नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. अशातचस मुंबई शहरातील एका पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईतील अंधेरी भागात काही पोस्टर्स लागले आहेत. या पोस्टर्सने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने काही पोस्टर अंधेरी भागात लावले आहेत. या पोस्टरवरील मजकुराने लक्ष वेधून घेतलं आहे. हे पोस्टर म्हणजे एका अर्थी मनसेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील अंधेरी भागात उत्तर भारतीय सेनेचे पोस्टर

‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने अंधेरी पश्चिममध्ये काही पोस्टर लावलेत. सावधान… उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे!!, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. ‘बटेंगे ते काटेंगे’च्या आधारावर मुंबईत ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर उत्तर भारतीय सेनाने मुंबई शहरातील अंधेरी परिसरात लावले आहेत.

उत्तर भारतीय सेना अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी या पोस्टरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भाजपने उत्तर भारतीयांची मन दुखावली आहेत. उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेच्या पाठीशी भाजप उभा आहे. ज्या पक्षाला उत्तर भारतीयांना मारायचे आहे, त्याला मत देऊ नका. मौलानाला 16 हजार रुपये पगार देतात पण पंडितांना एक रुपयाही देत नाही. भाजपचे गुपित उघड झालं आहे. राज ठाकरे यांनी आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात जय श्री रामचा नारा लावला नाही. कारण ते उत्तर भारतीय विरोधी आहेत, असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

पोस्टरची चर्चाच चर्चा

उत्तर भारतीयांबाबत मनसे पक्षाने कायम आक्रमत भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणांमध्ये उत्तर भारतीयांवर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच राज्यात विधानसभेची निवडणूक होत असताना हा मनसेसाठी इशारा आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

उत्तर भारतीय सेना हा तोच राजकीय पक्ष आहे. ज्याने विधानसभेच्या निवडणुकीत लॉरेन्स बिश्नोई यांना तिकीट देण्याचा दावा केला होता.हे पोस्टर अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ही पोस्टर आता चर्चेचा विषय बनली आहे. कारण मुंबईत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय राहतात. अंधेरी भागात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक आहे, असं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागवण्यात आलेले हे पोस्टर चर्चेत आले आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट