AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाला रोखण्यासाठी APMC मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी, पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

खबरदारी म्हणून प्रत्येक बाजारात अँटिजेन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी APMC मार्केटमध्ये होणार अँटिजेन चाचणी, पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: Nov 22, 2020 | 10:53 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये करोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक बाजारात अँटिजेन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात सध्या काही प्रमाणात किरकोळ विक्रीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दी बरोबर येणाऱ्या दुसऱ्या करोना लाटेचं संकट लक्षात घेता चार ही बाजारात करोना चाचणी केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यासाठीच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Municipal Commissioner order to held Antigen test in APMC market to stop the spread of corona)

बाजार समितीमध्ये आता एक करोना चाचणी केंद्र सुरू आहे. मात्र, बाजारात वाढणारी गर्दी लक्षात घेता अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. बाजार समितीमधून येणाऱ्या -जाणाऱ्या खरेदीदार, विक्रेते आणि इतर घटकांच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

कारण, बाजार समितीमधून येणाऱ्या-जाणाऱ्या घटकांचा संबंध थेट शहरातील व्यक्तींची येतो. त्यामुळे करोनाचा धोका शहरांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. यासाठीच खबरदारी म्हणून प्रत्येक बाजारात अँटिजेन आणि आर टी पी सी आर चाचणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अधिक काळजी घेण्याचं आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधून आता दिवाळीनंतर (Diwali) अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली. त्यामुळे आता अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी पोस्ट कोव्हिड – 19 चा (covid -19) धोका वाढला असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे कोरोनाची (Cororna) पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. अशात नागरिकांनी गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे अशा नियमांचं पालन करावं, असंही आवाहन केलं.

‘पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही’

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.” (Municipal Commissioner order to held Antigen test in APMC market to stop the spread of corona)

“आपण एका वळणावर आलेलो आहोत. पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही. आपण एका वळणावर असल्याने आपल्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल, सध्या आपण काळजी घ्यायला हवी,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

इतर बातम्या – 

पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट

CM Uddhav Thackeray | करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Municipal Commissioner order to held Antigen test in APMC market to stop the spread of corona)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.