BREAKING | पक्षाचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला, राष्ट्रवादीत कमालीची नाराजी, नेमकं काय घडतंय?

शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याची बातमी समोर आली आहे. या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.

BREAKING | पक्षाचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला, राष्ट्रवादीत कमालीची नाराजी, नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 5:59 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानक राजीनाम्याची घोषणा केल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी विश्वासात घेऊन राजीनामा द्यायला हवा होता अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची भावना आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपल्याला गृहित धरुन राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी कोणत्याही नेत्याला न विचारता राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या बैठकीत राजीनाम्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. यावरुनही नेत्यांमध्ये नाराजी आहे.

शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दिलेला राजीनाम्याचा मुद्दा हा पवार कुटुंबाचा अंतर्गत मुद्दा नाही. कारण राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशाप्रकारे अचानक राजीनामा देतात, त्या संदर्भातील कल्पना इतर कोणत्याही नेत्याला नसते. यावरुनच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा कुटुंबाचा प्रश्न नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे.

राजीनाम्याचा निर्णय जर आधीच ठरला होता, कारण अजित पवार यांनी स्वत: म्हटलं की, शरद पवार 1 मे ला राजीनाम्याची घोषणा करणार होते. पण त्यानंतर 2 मे ला राजीनामाची घोषणा करण्यात आली. राजीनाम्याचा निर्णय आधीच पवार कुटुंबियात झाला होता, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

पवार कुटुंबियांचा हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना पचनी पडताना दिसत नाही. कारण राष्ट्रवादी पक्ष आहे, अशा पद्धतीने पवार कुटुंबियांच्या अंतर्गत बैठकीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय होतो. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही नेते खासगीत ही नाराजी व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा पद्धतीने गृहित धरुन पक्ष चालवला जाऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

शरद पवार यांच्याकडून खंत व्यक्त

पक्षातील दिग्गज नेते नाराज असल्याचं समजल्यानंतर शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. शरद पवार यांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे. “६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

“१ मे १९६० रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं 1 मे शी वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं व्यक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो . ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.