AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Visit Mumbai Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचं उद्घाटन

Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 14, 2023 | 10:04 PM
Share

PM Narendra Modi Visit Mumbai Live Updates | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. या अधिवेशनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

PM Narendra Modi Visit Mumbai Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचं उद्घाटन

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. या अधिवेशनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Oct 2023 09:58 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांच्याकडून टीम इंडियाचं अभिनंदन

    मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यक्रमात टीम इंडियाला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं.

  • 14 Oct 2023 07:21 PM (IST)

    आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहा

    मुंबई | जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहा :

  • 14 Oct 2023 07:01 PM (IST)

    धनगर समाज आरक्षणाबद्दल दिलीप वळसे पाटील यांचे मोठे भाष्य

    धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासीमध्ये समाविष्ठ करु नका, देशात आदिवासी खासदारांची संख्या मोठी आहे याचे भान ठेवा केंद्र सरकारही कोसळायला वेळ लागणार नाही असे थेट दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.  केंद्र सरकारला इशारा दिलाय

  • 14 Oct 2023 06:50 PM (IST)

    Pune News | गादी कारखान्याला भीषण आग

    पुण्यात गादी कारखान्याला भीषण आग लागलीये. पुण्यातील वडकी परिसरातील ही घटना आहे. दुपारी ३ च्या सुमारास घडली घटना. आगीत कुठलीही जिवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या ७ वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

  • 14 Oct 2023 06:48 PM (IST)

    Narendra Modi | मुख्यमंत्र्यांकडून नरेंद्र मोदी यांचं स्वागत

    मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकदिवसीय मुंबई दौऱ्यासाठी आज मुंबई विमानतळावर आगमन झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनासाठी ते मुंबईत आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं.

    यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते.

  • 14 Oct 2023 06:28 PM (IST)

    मीरा भाईंदर येथे घडली धक्कादायक घटना

    मीरा भाईंदर येथे रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने त्यात पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये. भाईंदरच्या इंद्रलोक संकुलात ही घटना घडलीये. स्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • 14 Oct 2023 06:12 PM (IST)

    विरारमधील दोन तरुणांवर गोळीबार

    विरारमधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर काल रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फिरोज रफिक शेख ( वय 27 ),अजीम अस्लम सय्यद ( वय 30 ) असे जखमींचे नाव असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • 14 Oct 2023 05:44 PM (IST)

    PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावरुन कार्यक्रमाच्या दिशेला रवाना

    मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावरुन जिओ वर्ल्ड सेंटरच्या दिशेला रवाना झाले आहेत.

  • 14 Oct 2023 05:34 PM (IST)

    Mumbai News | ‘जियो वर्ल्ड सेंटर’ बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जियो वर्ल्ड सेंटर’ बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या सत्राच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या सेंटरचा परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाद्वारे आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा तपासण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावरून 5 वाजून 40 मिनिटांनी वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’च्या दिशेने रवाना होतील. त्यांचं पारंपारीक पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे, ज्याची तयारी सध्या पूर्ण झालीय.

  • 14 Oct 2023 05:29 PM (IST)

    Narendra Modi Visit Mumbai Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल

    मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेस बैस मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

Published On - Oct 14,2023 5:28 PM

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ