Sanjay Raut : रेडीरेकनरप्रमाणं कागदपत्रं बनवली, मग भ्रष्टाचार कसा? सुनील राऊतांचा सवाल, स्वप्ना पाटकरवरही आरोप

संजय राऊत हे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांना शिवसेनेपासून, उद्धव ठाकरेंपासून तोडायचे आहे. राऊतांना भाजपा घाबरते. म्हणूनच अशा राजकीय आकसापोटी आणि सुडाच्या भावनेतून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : रेडीरेकनरप्रमाणं कागदपत्रं बनवली, मग भ्रष्टाचार कसा? सुनील राऊतांचा सवाल, स्वप्ना पाटकरवरही आरोप
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 2:44 PM

मुंबई : अलिबागची जमीन ईडीच्या ताब्यात (ED enquiry) आहे. तेच प्रकरण ईडीने आज सादर केले. अलिबागची जमीन आम्ही घेतली त्यावेळी त्याचा रेडीरेकनरचा दर 50 लाख होता. तर दहा वर्षानंतर त्या जागेचा रेडीरेकनरचा दर (Ready Reckoner) हा 1 कोटी सहा लाख रुपये आहे. यामध्ये कोणताही कॅशचा व्यवहार झालेला नाही. जी कागपत्रे बनवली ती रेडीरेकनरच्या दराप्रमाणे बनवली. मग यात भ्रष्टाचार कसा आला, असा सवाल संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून ईडीने जी कागदपत्रे आम्ही इन्कम टॅक्सला दाखवले होते, संजय राऊतांना (Sanjay Raut) राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात दाखवले होते, अशी सर्व कागदपत्रे सादर करून प्रवीण राऊत यांच्याशी संबंध जोडण्याचा चुकीचा आणि खोटा प्रयत्न ते करत आहेत. तसेच न्यायव्यवस्थेची दिशाभूल ईडी करत आहे. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून चौकशीला पूर्ण सहकार्य करू. सोमवारी आम्हाला नक्की न्याय मिळेल, असेही सुनील राऊत म्हणाले.

‘कोण स्वप्ना पाटकर?’

स्वप्ना पाटकरवर आरोप करताना ते म्हणाले, की कोण स्वप्ना पाटकर? हीच स्वप्ना पाटकर खोट्या कागदपत्रांच्या आरोपाखाली अडीच-तीन महिने अटकेत होती. अशा अटकेत राहिलेल्या व्यक्तीच्या आरोपांवर किती विश्वास ठेवायचा, हे सरकारने आणि ईडीने ठरवावे, असे सुनील राऊत म्हणाले. मागील 4 दिवसांपासून ते कोठडीत आहेत. ते कसे आरोप करतील? याप्रकरणी मोबाइल घेऊन तपास करावा, असे सुनील राऊत म्हणाले. पोलिसांनी अद्याप मोबाइल ताब्यात घेऊन आरोपांची शहानिशा केली नाही, असेही सुनील राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘संजय राऊतांना भाजपा घाबरते’

संजय राऊत हे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांना शिवसेनेपासून, उद्धव ठाकरेंपासून तोडायचे आहे. राऊतांना भाजपा घाबरते. म्हणूनच अशा राजकीय आकसापोटी आणि सुडाच्या भावनेतून ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. मात्र आम्ही हार मानणार नाही. सोमवारी आम्हाला जामीन नक्की मिळेल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, संजय राऊत यांच्या ईडी कोठडीदरम्यान त्यांच्या रुममध्ये व्हेंटिलेशन नाही. एका कॉन्फरन्स रूममध्ये त्यांना ठेवले आहे. ते हृदय रोगाचे रुग्ण आहेत. शिवाय त्यांना स्वत:सह शिवसेना पक्षाचीदेखील काळजी आहे, असेही राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.