आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, […]

आता महाराष्ट्राचा नंबर : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व ट्रेंड बदलला होता. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले. सर्व काँग्रेस नेते एकत्र येऊन हे यश मिळवलं आहे. देशात कोणी कोणत्या पक्षाला संपवू शकत नाही”.

याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आम्ही सर्व काँग्रेस नेते जोमाने काम करु. राज्यात आता राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत येतील हे नक्की आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

पाच राज्यांचा निकाल

पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने आगेकूच केली आहे. पाचपैकी तीन राज्यात काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर छत्तीसगडमध्ये 90 पैकी तब्बल 60 जागांवर आघाडी घेतली आहे. तिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपात काँटे की टक्कर आहे. मिझोराममध्ये स्थानिक एमएनएफ आघाडीवर आहे तर तेलंगणात टीआरएसने बहुमताचा आकडा पार केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण सत्ता मिळवतं, याचा निर्णय आज जाहीर होत आहे.

संबंधित बातम्या 

मिझोरामचे मुख्यमंत्री 2 ठिकाणी उभे राहिले, दोन्ही ठिकाणी पडले  

मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार   

तेलंगणात ओवेसींच्या भावाचा निकाल लागला!   

वाजपेयींच्या पुतणीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची धाकधूक वाढवली! 

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.