‘काळजाच्या तुकड्याने’ यकृताचा तुकडा दिला, पोलीस पित्यासाठी नवी मुंबईच्या लेकीचं दातृत्व!

अवयवदानाबद्दल आपण नेहमीच ऐकतो. अवयवदान केले पाहिजे यासाठी विविध मोहीमा राबवण्यात येतात. कारण आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवीन जीवन मिळते. मात्र, आपल्या देशामध्ये अवयवदान करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

'काळजाच्या तुकड्याने' यकृताचा तुकडा दिला, पोलीस पित्यासाठी नवी मुंबईच्या लेकीचं दातृत्व!
दिलीप सेल आणि प्रियंका सेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 16, 2021 | 12:45 PM

मुंबई : अवयवदानाबद्दल आपण नेहमीच ऐकतो. अवयवदान (Organ donation) केले पाहिजे यासाठी विविध मोहीमा राबवण्यात येतात. कारण आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नवीन जीवन मिळते. मात्र, आपल्या देशामध्ये अवयवदान करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अवयवदानाचे काय महत्व आहे, हे आपल्याला मुंबईमध्ये घडलेल्या घटनेवरून समजू शकते. मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पीएसआय दिलीप सेल यांचे यकृत खराब झाले होते.

प्रियंकाने वडिलांना दिले यकृत

यकृत खराब झाल्यामुळे हेपेटायटिस बीचा त्रास दिलीप सेल यांना सुरू झाला. तसेच त्यांना कोरोनाची लागण देखील झाली. यावेळी डाॅक्टरांनी त्यांना यकृत बदलण्याचा सल्ला दिला. दिलीप सेल यांची 22 वर्षांची मुलगी प्रियंका सेल हिने वडिलांना यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण व्यवस्थितरित्या झाले आणि जणू मुलींनेच आपल्या वडिलांना दुसरा जन्म दिला.

यकृत प्रत्यारोपणानंतर दिलीप सेल ठणठणीत

विशेष म्हणजे यकृत प्रत्यारोपणानंतर दिलीप सेल ठणठणीत आहेत आणि त्यांना प्रमोशन देखील मिळाले असून ते आता पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहेत. अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. विक्रम राऊत म्हणाले की, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतात 150 हून अधिक यकृत प्रत्यारोपण केले आहे. अशाप्रकारे प्रत्यारोपण पूर्ण करून सामान्य व्यक्तीप्रमाणे रुग्णालयातून घरी जाऊन एखादा व्यक्ती पूर्वी प्रमाणे जीवन जगतो त्यावेळी आनंद होतो.

संबंधित बातम्या : 

Mumbai Murder | ट्रीटमेंटसाठी तीन लाख खर्च करण्यावरुन वाद, मुंबईकर सूनेने सासूचा गळा आवळला

अत्यंत कमी दरामध्ये नवी मुंबईकर करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें