AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Land Scam: पार्थ पवारांवरील कसं टळणार बालंट? अंजली दमानियांचा कायदेशीर मार्ग

Anjali Damania press conference : पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाने महायुतीवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अजितदादांनी आपल्याला यातील काहीच माहिती नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे.

Pune Land Scam: पार्थ पवारांवरील कसं टळणार बालंट? अंजली दमानियांचा कायदेशीर मार्ग
अंजली दमानिया पार्थ पवार, अजित पवार, दिग्विजय पाटील
| Updated on: Nov 12, 2025 | 10:51 AM
Share

Anjali Damania on Parth Pawar : मोंढवा आणि कोरेगाव पार्क या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांची अमेडिया कंपनी गोत्यात आली आहे. या कंपनीने जमीन गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एक रुपयाचा व्यवहार न करता 300 कोटींचे खरेदीखत करण्यात आले आहे. एकामागून एक धक्कादायक खुलासे होत असतानाच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कायदेशीर बारकावे समोर आणत महसूल विभागाच्या आणि दुय्यम निंबधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कायदे वाकवताना आणि आता कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणींचा डोंगर समोर आहेत याची माहिती त्यांनी अभ्यासपूर्णरित्या मांडली.

करार रद्द करण्याचे अधिकार नाहीत

पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी शीतल तेजवानीकडे खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले. गायकवाड कुटुंबाच्यावतीनं तेजवानींकडं सही करण्याचे अधिकार नाहीत. तर करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार, अमेडिया कंपनीकडे नसल्याचा दावा केला. कायद्याने हा व्यवहार रद्द करता येत नसल्याची सविस्तर माहिती दमानिया यांनी या पत्रकार परिषदेतून दिली.

मग पार्थ पवारांची सूटका कशी होणार?

खरेदीखत करताना जर खोट्या व्यक्ती उभ्या केल्या तर अशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा होऊ शकते. सात वर्षे शिक्षा, दंड अथवा दंड आणि शिक्षा अशा दोन्हींची कायद्यात तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. तर जो गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अमेडिया कंपनीचे नाव नाही. पार्थ पवार यांचे नाव नाही. महसूल मंत्री बावनकुळे म्हणतायेत की, ज्यांनी खरेदीखतावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुन्हा कायदा वेगळंच सांगतो हे दमानिया यांनी स्पष्ट केले.

अमेडिया ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म असल्याची माहिती त्यांनी दिली. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट 2008 हा त्याचा कायदा आहे. या कायद्यातील तरतूदी त्यांनी विषद केल्या. कलम 38 नुसार, लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने असा व्यवहार केला असेल तर मग त्यात कायदेशीर शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले. इतकेच नाही तर पार्थ पवार यांच्यावरील बालंट दूर व्हायचे असेल तर त्यांनी हा व्यवहार झाल्याचं मला माहितीच नव्हतं. असे रजिस्ट्रेशन होत असल्याचे आपल्या गावीच नव्हते असे म्हटले तर मग हे सर्व खापर दिग्विजय पवार यांच्यावर फुटेल असे त्यांनी सांगितले. तर या सर्व प्रकरणात पार्थ पवार याला वाचवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात अजितदादांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. तर लवकरच याविषयी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.