AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंच्या नवीन खेळीने उद्धव ठाकरेंना टेन्शन, फडणवीसांशी भेट, प्रेशर टॅक्टीसचा फायदा होणार?

Raj Thackeray CM Devendra Fadnavis Visit : राज ठाकरे यांच्या नवीन खेळीने राज्याचे राजकारण पुन्हा नव्या वळणावर आले आहे. तर काही जण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुत्सद्देगिरी असल्याचा कयास, अंदाज लावत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

राज ठाकरेंच्या नवीन खेळीने उद्धव ठाकरेंना टेन्शन, फडणवीसांशी भेट, प्रेशर टॅक्टीसचा फायदा होणार?
राज ठाकरेंची खेळी की फडणवीसांची मुत्सद्देगिरी Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 12, 2025 | 11:41 AM
Share

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मुंबईत घडत आहे. वांद्रे परिसरातील ताज लँड अँड हॉटेल हे राज्यातील राजकीय घाडमोडींचं मोठे केंद्र ठरलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या तासाभरापासून दोघे सोबत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राज ठाकरे यांची ही नवीन खेळी मुंबईच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवणारी ठरेल. ही प्रेशर टॅक्टीस आहे का? असा सवाल ही उभा ठाकला आहे. त्यामुळे जर ही चर्चा अनुकूल असेल तर त्याचा जबरी फायदा भाजपाला होईल हे वेगळं सांगायला नको. तर मनसेला सुद्धा या राजकीय लाभ पदरात पाडून घेता येईल, असा राजकीय तज्ज्ञांचा व्होरा आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अचूक वेळ साधली?

आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटाकडून त्याविषयी सकारात्मक विधानं, वक्तव्य करण्यात येत होती. सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका खिशात घालण्यासाठी सध्या भाजपा आणि शिवसेनेत जोरदार धुमश्चकी उडालेली आहे. त्यादृष्टीने दोन्ही ठाकरेंची युती ही भाजपासाठी डोकेदुखी ठरणारी होती.

मराठी, मराठी माणूस हा मनसे आणि ठाकरे सेनेचा अजेंडा आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिंदी भाषिक, गुजराती, मासांहार हे मुद्दे वरचेवर वादाचे ठरत आहेत. त्यामुळे मराठी माणसावर परप्रांतियांची मुजोरी सातत्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुखावणारी होती. येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीच होती.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आता संदेश नाही थेट बातमीच देऊ असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याने राज्याच्या भुवया ताणल्या गेल्या होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही नवीन समीकरणं तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे. या युतीच्या चर्चेला फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचे म्हटले जात आहे. तर फडणवीसांनी अचूक वेळ साध्यलाचा दावा सुद्धा करण्यात येत आहे. या दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. ही राजकीय सूचक भेट आहे हे सांगायला अर्थात ज्योतिषाची गरज नाही. हा उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे चेकमेट असल्याचे राजकीय पंडित दावा करत आहेत.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.