Nana Patole : “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्युटर गेम”, नाना पटोलेंचा बॉम्ब, म्हणाले PAK ला तर अगोदरच…
Operation Sindoor : नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी केलेल्या वक्तव्याने आता आग्या मोहळ उठलं आहे. हे ऑपरेशन म्हणजे कम्युटरमधील व्हिडिओ गेम असल्याचा बॉम्ब पटोले यांनी टाकला. तर ट्रम्प यांच्या दबावाखालीच ऑपरेशन थांबवण्यात आल्याचा दावा नानांनी केला.

Nana Patole on Operation Sindoor : राजकारणाच्या ना ना तऱ्हा असतात. राजकारणात विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम करत असतो. काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूर प्रकरणात सरकारवर मोठा घणाघात घातला. ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्युटरमधील व्हिडिओ गेम असल्याचा बॉम्ब माजी काँग्रेस अध्यक्षांनी टाकला. त्यांच्या या वक्तव्याने एकच आगे मोहळ उठले आहे. त्यांच्या विधानावर आता राजकारण तापले आहेत. त्यांच्या विधानावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेमकं काय म्हणाले पटोले?
तुम्ही तर पाकिस्तानला अगोदरच केले जागे
“परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने हे स्पष्ट झाले होते की, आपण पाकिस्तानमधील कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करणार आहोत. त्यांनी मग त्या ठिकाणाहून त्यांची माणसं हटवली. याचा अर्थ असा की, जो खेळ लहान मुलं कम्युटर, संगणकावर खेळतात, तसाच हा प्रकार होता.” भारताने पाकिस्तानला अगोदरच सांगण्यात आले होते की त्यांच्या कोणत्या ठिकाणी हल्ले होणार आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला.
Donald Trump यांच्या दबावापुढे झुकले सरकार
ऑपरेशन सिंदूर भारत सरकारने अमेरिकेच्या व्यापाराविषयीच्या धमकीनंतर थांबवले असा दावाही नाना पटोले यांनी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वांरवार दोन्ही देशांना धमकी देऊन युद्ध विराम करण्यास भाग पाडल्याचे पटोले म्हणाले. युद्ध विराम केला नाही तर व्यापार थांबवू अशी धमकी अमेरिकेने दिली होती. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर भारताने थांबवल्याचे पटोले म्हणाले.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी लपले कुठे?
नाना पटोले यांनी मोदी सरकारवर मोठा सवाल उपस्थित केला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी लपले तरी कुठे? ते अजून फरार कसे, ते अजून का सापडले नाहीत. त्यांचे धागेदोरे का सापडले नाहीत अशा प्रश्नांच्या सरबत्ती त्यांनी केली. पुलवामा हल्ल्याचे सत्य अजूनही समोर आले नसल्याचा दावा पटोले यांनी केला. मोदी सरकार या प्रकरणात वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप नानाभाऊंनी केला.
22 एप्रिल 2025 रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये 26 पर्यटकांचा जीव गेला होता. दहशतवाद्यांनी महिलांना लक्ष्य केले नाही तर पुरूषांना मारले. यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यात अनेक दहशतवादी मारल्या गेल्याचे समोर आले होते.
