AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरे प्रथमच बोलले, ‘मनसेचे मतदान…’

Raj Thackeray Speech In MNS Melava: मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही.

विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरे प्रथमच बोलले, 'मनसेचे मतदान...'
राज ठाकरे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 30, 2025 | 1:12 PM
Share

Raj Thackeray Speech In MNS Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. आतापर्यंत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत होते. परंतु राज ठाकरे यांनी या निकालावर काहीच भाष्य केले नव्हते. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाल्यावरही त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली नव्हती. राज ठाकरे यांनी हे मौन अखेर मनसे मेळाव्यात सोडले. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळला.

काय म्हणाले राज ठाकरे

मनसेचा राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला. जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता असा निर्णय कसा आला. माझ्याकडे एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आला. तो म्हणाला, “इतना सन्नाटा क्यों है भाई…कोई तो जीता होगा.” याचा अर्थ संघातील लोकांचाही निकालावर विश्वास नाही. खरं पहिले तर काही गोष्टींवर विश्वास बसू शकत नाही.

मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्र्यास या निकालावर शॉक बसला आहे. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येतील, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या अन् जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्या शरद पवार यांना दहा जागा मिळतात. लोकांनी आपणास मतदान केले आहे, परंतु ते आपल्यापर्यंत आले नाही. ते मतदान कुठेतरी गायब झाले. अशा निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या.

राज ठाकरे यांनी भाजपने भूमिका कशी बदलत गेली त्याची अनेक उदाहरणे आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले, या सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोक बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचे सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुम्हाला सांगितले जाते राज ठाकरे यांनी भूमिका बदलली.

Follow Us
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!