AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही स्वीकारा – राज ठाकरे कडाडले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलन आणि पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शांततामय आंदोलनाचे दमन आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचार हे निंदनीय असून, सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. सत्तेचा उद्दामपणा सोडून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Raj Thackeray : पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही स्वीकारा - राज ठाकरे कडाडले
संयुक्त पत्रकार परिषेदत राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
| Updated on: Jul 23, 2026 | 12:23 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कशा प्रकारे चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतंय. शांततामय रित्या आंदोलन सुरू होतं. मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पदाची जबाबदारी घेता, तेव्हा त्या पदापासून आलेल्या अपयशाची देखील जबाबदारीही तुम्हीच घेतली पाहिजे, असं महणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे यांच्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पतर्कार परिशदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. सरकारवर टीका करतााना त्यांनी अनेक दाखले दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज व उद्धव यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कशा प्रकारे चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे दिसतंय. शांततामय रित्या आंदोलन सुरू होतं. मुलांवर केंद्रातून दबाव आणला जात आहे, त्यांना मारलं जात आहे. त्याचे परिणाम देशात उमटत आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत उमटत आहेत. ही साधी गोष्ट होती. या प्रकरणात भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. रजा अकादमी विरोधात आम्ही अरुप पटनायक आणि पोलीस आयुक्तांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा त्यांना बाजूला केलं होतं असं उदाहरण राज ठाकरेंनी सांगितलं.

तेव्हा आर.आर. पाटील यांचा राजीनामा घेतला…

मुंबईवरील हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में ऐसी घटना होती है असं आर आर पाटील म्हणाले होते, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे या प्रकरणात तुम्हीच जबाबदारी घेतली पाहिजे.  पदाची जबाबदारी घेता, मग अपयशाची जबाबदारीही घ्या,  हीच मागणी मुलांची आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

तिसऱ्यांदा पेपर फुटले होते. आम्ही केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊ नका म्हटलं होतं. पण त्यावेळी सत्तेमुळे त्यांची ऐकण्याची तयारी नव्हती. आजही नाही. प्रधानांच्या राजीनाम्यापुरती गोष्ट मर्यादित राहिली नाही. ती पंतप्रधान आणि गृहखात्यांपर्यंत गेली. मोदींनी आज ट्विट केलं. त्याला काही अर्थ नाही. या मुलांना बोलवून चर्चा केली असती. प्रकरण समजून घेतलं असतं तर एवढं प्रकरण झालं नसतं. सत्तेचा उद्दामपणा कशासाठी आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..